Home महाराष्ट्र सायकल वर प्रवास करून करतात पांडुरंगाची वारी

सायकल वर प्रवास करून करतात पांडुरंगाची वारी

129

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पांडुरंगाची वारी करतात गंगाखेड येथून दरवर्षी सायकलवारीचे आयोजन सायकल वारकऱ्यांच्या वतीने करण्यात येते यावर्षीही संत जनाबाई सायकल क्लबचे सहा सदस्य सायकल वारीत सहभागी झाले.(दिनांक 20 जून शुक्रवार) रोजी सकाळी 5 वाजता वारीला सुरुवात करून बार्शी येथे पहिला मुक्काम घेतला दिनांक 21 जून रोजी दुपारी पंढरपूर येथे सायकल वारकरी पोहोचले.
गंगाखेड शहरामधून डॉ.भगवान केंद्रे,सूर्या बडवणे,लक्ष्मण निरस, नितेश अल्लडवार,सचिन वाळके,शिवप्रसाद मठपती हे सायकल वारकरी पोहोचले गेल्या चार वर्षापासून संत जनाबाई मंदिर गंगाखेड ते पंढरपूर अशी सायकल वारी संत जनाबाई सायकल क्लबचे सदस्य न चुकता करत आहेत.
यावर्षीही सहा सायकल वारकरी सायकल वारीमध्ये सहभागी झाले होते.दिनांक 22 जून रोजी महाराष्ट्रातील 91 क्लबचे 4 हजार सायकलिस्ट पंढरपूर येथे पोहोचले. सकाळी प्रभात फेरी काढून विठ्ठल मंदिराला सायकलवर नगरप्रदक्षिणा घालून सर्व सायकलिस्टचा ताफा रेल्वे ग्राउंडवर रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झाला होता. पांडुरंगाचे दर्शन घेऊन गंगाखेड येथील सायकल वारकरी गंगाखेड कडे मार्गस्थ झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here