Home चंद्रपूर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे जितेंद्र प्रल्हाद मोरांडे यांना आचार्य पदवी जाहीर

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे जितेंद्र प्रल्हाद मोरांडे यांना आचार्य पदवी जाहीर

106

 

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठाने मानव्यशास्त्र विद्याशाखे अंतर्गत समाजशास्त्र विषयात आचार्य पदवी जि. प. प्राथ. शाळा नवेगाव लोन पं.स.सिंदेवाही जि. प. चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असणारे जितेंद्र प्रल्हाद मोरांडे यांना नुकतीच जाहीर केली आहे.

जितेंद्र प्रल्हाद मोरांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पोलीसांच्या कार्यात येणाऱ्या समस्यांचे अध्ययन या विषयावर मार्गदर्शक प्रा.डॉ. दशरथ तानबा गजभिये अनिकेत महाविद्यालय वडसा, प्रा.डॉ. स्निग्धा राजेश कांबळे समाजशास्त्र विभाग प्रमुख संशोधन केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी, प्राचार्य डॉ. देवेश मारोतराव कांबळे प्रमुख संशोधन केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात संशोधन कार्य पूर्ण केले.

शोधप्रबंध लवकरात लवकर पूर्णत्वास गेले पाहिजे याकरिता सदैव सहकार्य करणारे मा. श्री.डॉ. रविंद्र शेंडे माजी केंद्रप्रमुख केंद्र सरडपार पं.स. सिंदेवाही, मा. श्री. नरेंद्र डेंगे केंद्रप्रमुख, मा. श्री.देविदास गुरनुले मुख्याध्यापक, मा. श्री. सुकुमार नर्मलवार पदवीधर शिक्षक, मा.कु.सोनाली ज्ञानवल प्राथ.शिक्षिका या सर्वांचे श्री.जितेंद्र मोरांडे यांनी मनपूर्वक आभार मानून; त्यांनी आपल्या यशात आई, वडील, पत्नी, प्रक्षेप मोरांडे, होनेश मोरांडे व मित्र परिवाराचा महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here