Home महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुर्ले येथे शाळा प्रवेशोत्सव संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुर्ले येथे शाळा प्रवेशोत्सव संपन्न.

356

 

दोंडाईचा (प्रतिनिधी)- शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुर्ले येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२०२६ या वर्षी इयत्ता पहिली च्या विद्यार्थी जिल्हा परिषद मराठी शाळा विखुर्ले येथे दाखल झालेल्या सर्व पहिली च्या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पहिलीच्या विद्यार्थ्यांना गावातून बैलगाडी वर बसवून शोभा यात्रा काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके, वही, पेन्सिल, गणवेश, बुट सॉक्स, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मराठी शाळेत इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड म्हणून विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विखुर्ले ही पंचक्रोशीतील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या वर्षांपासून शाळेत सी.बी.एस.सी. पॅटर्न नुसार अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

त्या प्रसंगी विशेष शिक्षक पंकज चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक, रविंद्र चौधरी, कर्तव्यदक्ष उपशिक्षक राहुल पाटील, विखुर्ले ग्रामपंचायत सरपंच, जनाबाई शानाजी,भिल, उपसरपंच जगदिश तिरमले, मा सरपंच गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ बापु केदार, सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले, शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष, रविंद्र तिरमले, प्रकाश रामसिंग तिरमले, प्रकाश गणपत तिरमले, मधुकर पाटील, गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here