Home चंद्रपूर राजुरात शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप. – राजुरा,...

राजुरात शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप. – राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यांतील शिक्षकांचा सक्रिय सहभाग.

379

 

राजुरा १५ जुन
दिनांक २ ते १२ जून २०२५ दरम्यान इन्फंट जिजस पब्लिक स्कूल, राजुरा येथे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्कृष्ट रित्या पार पडले. या प्रशिक्षणात राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यांतील शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रशिक्षणाचा उद्देश शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक कौशल्ये, मूल्यांकन प्रणाली आणि वेतन श्रेणीसंबंधी प्रक्रिया, विविध कायदे याबाबत सखोल मार्गदर्शन देणे हा होता.सदर प्रशिक्षण हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर, शिक्षण विभाग जि. प. चंद्रपूर व राजुरा चे गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले. या प्रशिक्षण करिता संस्थेचे अध्यक्ष अभिजित धोटे, शाळेचे दोन्ही मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगु , मंजुषा अलोने, अजहर सिद्दीकी यांनी उत्तम सहकार्य केले. प्रशिक्षण समन्वयक तथा शिविअ सावनकुमार चालखुरे, शिविअ विशाल शिंपी, केंद्र प्रमुख रामा पवार, नारायण तेलकापल्लीवार, प्रभाकर जुनघरे, किरण कामडी, आय.टी. समन्वयक आशिष बहादुरे व सर्व सुलभक इत्यादीनी प्रशिक्षण संचालनाचे कार्य केले. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मंगला तोडे यांनी मार्गदर्शनात शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले. विविध प्रशिक्षणार्थी यांनी मनोगतात प्रशिक्षण उत्कृष्ट झाल्याचे सांगितले.
दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. सहभागी शिक्षकांनी प्रशिक्षणाबद्दल आनंद व्यक्त करत याचा उपयोग आपल्या अध्यापन कार्यात निश्चितच होईल अशी प्रतिक्रिया दिली. या प्रशिक्षणाला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून म्हणून मुसा शेख, लिंगोराव सोयाम, राजेश बोळे, काकासाहेब नागरे, ज्योती गुरनुले, भीमराव कोरडे, विकास गेडाम, विनोद वाघमारे, इरफान शेख, विकास भांडारवार , कैलास मेश्राम, नरसिंग पांचाळ इत्यादीनी कार्य केले. तर प्रशिक्षण करिता सहायक म्हणून गीता जांबुलवार, देवेंद्र रहांगडाले, राजकुमार भुरे, राकेश रामटेके इत्यादीनी कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here