Home महाराष्ट्र 24 एप्रिल रोजी चिमूर येथे ग्रामजयंती महोत्सव

24 एप्रिल रोजी चिमूर येथे ग्रामजयंती महोत्सव

172

 

चिमूर- दि.२४ एप्रिल रोज गुरूवारला श्रीगुरूदेव ग्रामविकास मंडळ इंदिरानगर मेन रोड चिमूर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव आयोजित केलेला आहे.
यानिमित्ताने पहाटे ५ वाजता परिसर स्वच्छता व सफाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, परमहंस आडकोजी महाराज, मातोश्री मंजुळामाता यांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान त्यानंतर सामुदायिक ध्यान घेण्यात येईल.
दुपारी ३ वा.ग्रामगीता अध्यायाचे वाचन, मंजुळामाता महिला भजन मंडळ इंदिरानगर चिमूर यांचे भजन, त्यानंतर श्रीगुरूदेव ग्रामविकास भजन मंडळ चिमूर यांचे भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वा.सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन घेण्यात येईल.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवाधिकारी जगन्नाथ गोडे, उपग्रामसेवाधिकारी अल्काताई बोरतवार,सचिव देवराव नन्नावरे,गौरव बोकडे, शंकरराव देशकर, रवींद्र वाढई, राजेंद्र मोहितकर गुरूजी, छायाताई होले, प्रमिलाताई सोनटक्के, सुरेश पंढरे, रामदास भोयर, प्रकाश जैस्वाल, बारेकर गुरूजी, मिराबाई बोकडे, प्रमिलाताई करंडे व सर्व सेवक प्रयत्न करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here