Home महाराष्ट्र सौंदर्य स्थळी टाकले थर्माकोल ; नगरपरिषद घेत आहे दूकानदाराचा शोध पर्यावरण...

सौंदर्य स्थळी टाकले थर्माकोल ; नगरपरिषद घेत आहे दूकानदाराचा शोध पर्यावरण प्रदुषित प्रकरणी करणार दंडात्मक कारवाई ; सीओंनी घेतली सोशल मिडीयाची दखल

113

 


साकोली : शहरातील नवनिर्माण तलाव सौंदर्य स्थळी शहरातील अज्ञात कुणी इलेक्ट्रॉनिक दूकानदाराने शुक्रवारी ०४ एप्रिलला बंदी असलेले थर्माकोल व प्लॉस्टीकचा कचरा आणून टाकले. तर हे पर्यावरण प्रदुषित करून नियमांचे उल्लंघन करणारा तो दूकानदार कोण याचा नगरपरिषद अधिकारी व चमु शोध घेत आहेत.
शहरात एकोडी रोड चौकात तलाव सौंदर्यीकरण सुरू आहे. शुक्रवारी स. १० वा. दरम्यान बालोद्यान कडेला कुणीतरी सॅमसंग रेफ्रीजरेटर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची पॅकींगचे मोठमोठे थर्माकोल व भरपूर पॉलीथीन आणून टाकले. हे दृश्य फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांनी पाहिले. तातडीने त्यांनी साकोली सोशल मीडियावर वृत्तसेवेसाठी कळविले. हे वृत्त दू. १२:१२ ला स्थानिक सोशल मिडीयातून आले. यातच सीओ मंगेश वासेकर व प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे यांना हा प्रकार व्हाट्सअप प्रसारमाध्यमांवर दिसला. त्यांनी तातडीने घटनास्थळी स्वच्छता निरीक्षक धिरज राणे व स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता संतोष दोंतुलवार यांना पाचारण केले. कारण बंदी असलेले थर्माकोल व भरपूर पॉलीथीन येथे आणून टाकीत हा पर्यावरण परीसराला काही लोक गलिच्छ करीत आहेत. मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे यांच्या आदेशानुसार एकोडी रोड चौक तलाव सौंदर्यीकरण बायपास रोडवर बालोद्यान कडेला हा इलेक्ट्रॉनिक सामानांचे पॅकींगचा टाकाऊ कचरा आणून टाकला आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदुषण केल्याच्या गंभीर विषयी आता नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक धिरज राणे, स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता संतोष दोंतुलवार, कर्मचारी आनंद रंगारी, प्रकाश गेडाम हे त्या अज्ञात इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. व दोषी आढळल्यास त्यावर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत २०१६, २०१८, २०२१ नुसार महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अन्वये गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल असे नगरपरिषदेने कळविले आहे.

——–

“सार्वजनिक शासकीय स्थळांवर कुणीही दूकानातील कचरा आणून टाकू नये. आढळून आल्यास नगरपरिषदेतर्फे तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल. या प्रकरणी बंदी असलेले थर्माकोल व प्लॉस्टीकचा कचरा आणून टाकला. व पर्यावरण प्रदुषित करणे या गुन्ह्यात पात्र असून यावर आम्ही आजच तातडीने कारवाई सुरू केली आहे. यापुढे शासकीय सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य दिसल्यास ताबडतोब जनतेने नगरपरिषदेला कळवावे”
— मंगेश वासेकर, मुख्याधिकारी
नगरपरिषद साकोली सेंदूरवाफा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here