Home महाराष्ट्र गंगाखेड शहर कृती आराखडा C-LAP समितीची बैठक संपन्न

गंगाखेड शहर कृती आराखडा C-LAP समितीची बैठक संपन्न

326

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26मार्च):-दीनदयाळ जन अजिविका योजनेअंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक नगर परिषदेच्या सभागृहामध्ये दिनांक 25/03/2025 रोजी घेण्यात आली. शहरी गरिबी निर्मूलन योजनेअंतर्गत दीनदयाळ जन आजविका योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागासोबत बैठक घेण्यात आली, बैठकीचे अध्यक्ष मा. मुख्याधिकारी श्री जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागातील समितीच्या सदस्यांनी रोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील शहरातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपले सखोल विचार व्यक्त केले. या बैठकीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश कुमार डोंगे, लेबर ऑफिस प्रतिनिधी किरण बळखंडे, शॉप इन्स्पेक्टर लेबर ऑफिस पेरके सर तसेच नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक शेख अफरोदिन, दिव्यांग विभाग प्रमुख तातोडे सर ,कृषी अधिकारी प्रतिनिधी मगर मॅडम, गट शिक्षण अधिकारी श्री भगवान ठुले सर, विस्तार अधिकारी व्ही एन फुटके,जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी व्ही आर जोंधळे , जिल्हा सांख्यिकी अधिकारी अजिंक्य गवई, एसबीआय बँकेचे पागोटे ए.व्ही , MSW प्रतिनिधी सदाशिव कुंडगीर पथविक्रेता प्रतिनिधी भगवान सलगर, नरहरी कुठेवाढ, हनुमान धापसे, विद्युत विभाग प्रमुख सुवास आगलावे, प्रधान मंत्री आवास योजना प्रतिनिधी आम्रपाली साळवे, अंजनी शहर स्तर संघाच्या प्रतिनिधी कोमल गाडे, शितल पारवे ,प्रियंका घो, रंजना तुपे, करुणा वावळे, वस्तीस तर संघाच्या अध्यक्ष सीमा घनवटे, निर्मला होनराव, निशा साळवे, संगीता साळवे, मथुरा चोरघडे इत्यादी बैठकीचे प्रस्ताविक मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर यांनी C-LAP म्हणजे काय, पुढील पाच वर्षाचा( C-LAP) कृती आराखडा करण्यासाठी विविध विभागाची आवश्यकता का आहे.

याची माहिती दिली तसेच पीएम इंटरनसीप योजनेअंतर्गत इंटरनशिप करिता जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी ULB स्तरावरून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन समुदाय संघटक वंदना परतवाघ यांनी केले. तर आभार शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापक राहुल साळवे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्ती संतोषी ढगे,वंदना मोरे, मंगल घाटूळ, सुनिता वाघमारे, राजकन्या नरवाडे यांनी मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here