Home महाराष्ट्र सोमवारी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

सोमवारी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

233

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.8मार्च):-शहरातील गीता मंडळ येथे (दि.10 मार्च सोमवार) रोजी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांच्या सेवेसाठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात डोळ्यांच्या त्रासामधून गरजू रुग्णांची मुक्तता व्हावी यासाठी दिनांक 10 मार्च सोमवार रोजी सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत डॉ.लाइन गीता मंडळ येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे व शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांचे परभणी येथील लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

डोळ्यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आपली नाव नोंदणीसाठी 9822797798,99221239 87,9604469655,9096908999 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचे आहे नोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष लॉ.जगदीश तोतला,सचिव लॉ.भगत सुरवसे,कोषाध्यक्ष लॉ.अभिनय नळदकर,झोन चेअरपर्सन लॉ.अतुल गंजेवार,कॅबिनेट ऑफिसर लॉ.संजय सुपेकर,लॉ.गोविंद रोडे,लॉ.श्रीधराचार्य जोशी,उपाध्यक्ष लॉ.बंडू घुले,लॉ.मकरंद चिनके,प्रदीप गुंडाळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्याच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here