


▪️आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) यांचे आयोजन
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.8मार्च):-आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण ) यांच्या संयुक्त विद्यमाने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्कर येसेकर प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक तथा नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) चे अध्यक्ष दिपक सातपुते , आशादेवी शाळेचे सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, दिपक मडावी, कु. सोनल नक्षीने, वैशाली बोबडे, नेहा तळवेकर, सविता गेडेकर उपस्थित होते.
उपस्थीत वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत अभ्यासाबद्दल आणि शाळेतील उपक्रम, खेळ याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भास्कर येसेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक तथा नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) चे अध्यक्ष दिपक सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकेतून निरोप समारंभाची रुपरेषा विद्यार्थ्यांना पटवून दिली.
सूत्रसंचालन बंडू बोढे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक मडावी यांनी मानले.














