


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चंद्रपूर(दि.3मार्च):-स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेत्ररोग तपासणी शिबिर तथा नेत्रदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. एस. एम. पेंदाम, डॉ .अनिल धस , नेत्रदान समुपदेशक डॉ. योगेंद्र इंदोरकर , कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर आदींची उपस्थिती होती. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात एकूण ५४७ प्रशिक्षणार्थांची नेत्र तपासणी केली .
तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रदान समुपदेशक डॉ. योगेंद्र इंदोरकर यांचे नेत्रदानाविषयी मार्गदर्शन झाले . यावेळी एकूण १५४ प्रशिक्षणार्थ्यांनी नेत्रदानाचे स्वयंस्फूर्त फॉर्म भरून दिलेत. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. सुप्रसिद्ध नेत्ररोग चिकीत्सक डॉ. चेतन खुटेमाटे यांनीही शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एन.इरदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एन.टी. गराड यांनी केले.















