Home महाराष्ट्र विभागस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा स्पर्धेत म्हसवड च्या विद्यार्थ्यांचे यश

विभागस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा स्पर्धेत म्हसवड च्या विद्यार्थ्यांचे यश

200

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.18फेब्रुवारी):-शालेय विभाग स्तरीय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ला सांगली जिल्ह्यातील कसबे वांगी कडेगाव कडेपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये म्हसवड येथील शालेय विद्यार्थ्यांनी यश संपदन केले 

 या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत म्हसवड गावचे चार विद्यार्थ्यांनी केले. या शालेय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या म्हसवड गावचे आणि शाळेचे नाव कोल्हापूर विभागात उंचावत एक मानाच तुरा शिरपेचात रोवला.

  पवनी भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेसाठी म्हसवड येथील धनश्री बंडोपंत लोखंडे (गोल्ड मेडल)सिद्धनाथ हायस्कूल, रचना महादेव साळुंखे (गोल्ड मेडल)मेरी माता हायस्कूल, श्लोक पुष्पेंद्र कलढोणे (गोल्ड मेडल) क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, यशश्री बंडोपंत लोखंडे (सिल्वर मेडल)सिद्धनाथ हायस्कूल या विद्यार्थ्यांची निवड झाली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, आणि सामाजिक, राजकीय लोकांनी त्यांचे अभिनंदन केले यांना मार्गदर्शन लोखण्डे सरांचे लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here