


येवला चे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना पुर्ण भारत ओळखतो. त्यांनी सामाजिक न्यायाची चळवळ बिहार पर्यंत पोहचवली होती. पण मधेच अति लोभाने चुक झाली. अतिरिक्त संपत्ती जमा केली. त्यात ते पकडले गेले.जेलमधे गेले. ते सुद्धा नरेंद्र मोदी विरोधात बोल्ड भुमिका घेतल्यामुळे. गादावरीच्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. आता फक्त शेवाळ उरलेले आहे.
छगन भुजबळ साहेब दिर्घकाळ मंत्री, पालकमंत्री होते. तर मंत्री ला सरकारी निधीतून किती व कसे परसेंटेज मिळते, ते माहीत आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे कि त्यांनी ती माहिती जाहिर सांगावी. किमान आम जनतेला कळेल तरी आमच्या निधीची चोरी कशी होते? आमचे आमदार खासदार मंत्री कसे चोरी करतात? पालकमंत्री ला कोठून, कसे हप्ते मिळतात? त्यातून मुख्यमंत्री ला किती हिस्सा द्यावा लागतो?
भुजबळ साहेबांना,मी शिवराम पाटील, जळगाव विनंती करतो कि,त्यांनी आता जास्त भीती न बाळगता हे प्रामाणिकपणे सांगावे. मला एकटा दुकट्याला नाही, जाहिर सांगावे. जेणेकरून आम्ही आम जनता, जे निवडून येऊ शकलो नाही किंवा निवडणूक लढलो नाही तर कळेल तरी आम्ही दिलेला कर कसा चोरीला जातो?
मी नाशिक जिल्ह्यातील अनेक मित्रांना विनंती केली कि, तुम्ही छगन भुजबळ यांना प्रत्यक्ष भेटून किंवा पीए मार्फत आमच्या भेटीचे नियोजन करावे. मी येतो. प्रश्न विचारतो. साहेब उत्तर देतील. लोक ऐकतील. जितकी लोकसेवा भुजबळ यांनी पुर्ण आयुष्यात केली असेल त्यापेक्षा ही मोठी सेवा होईल. आम्ही अनेक पिढ्या तुमचे आभारी राहू.
भुजबळ साहेबांनी जर हे उघड उघड सांगितले, खुले दिलसे, खुले मनसे तरीही त्यांचेवर आता इडी ,बेडी ची कोणतीही कारवाई होणार नाही. जी व्हायची ती होऊन गेली आहे. “मतलब ,जिस बातका डर था, वो तो हो गया. अब डर किस बातका.”
तरीही तशी भीती वाटत असेल तर तर मोदी साहेबांच्या विरोधात काहीच बोलू नका. कारण त्यांच्या विरोधात बोलले तरच तुमच्यावर कारवाईची शक्यता आहे. अन्यथा तुम्ही किंवा कोणी पुर्ण हिंदुस्थान लुटून खाल्ला तरी मोदी तुमच्यावर कारवाई करणार नाहीत. उलट मोदी साहेब तुम्हाला शाबासकी देतील. कदाचित ताबडतोब भाजपात घेऊन मंत्री बनवतील.
भुजबळ साहेब, आता या उतार वयात तुम्ही जास्त भीती बाळगू नका. महात्मा ज्योतिबा फुलेंनी कधीच कोणाची भीती बाळगली नाही.तुम्ही तर स्वताला त्यांचे अनुयायी म्हणवून घेतात. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज होता. तर मग तुम्हाला सुद्धा सत्य सांगणे आवडेलच.आणि आम्हालाही आवडेल.
तुम्हाला जसे महात्मा फुले आवडतात तसे मला महात्मा गांधी आवडतात. तर मग, दोन्ही महात्म्यांना स्मरून आपण इतके सत्य काम करावे.
भुजबळ साहेब, तुम्ही आता मंत्री नाहीत. हे आमच्या दृष्टीने चांगले झाले आहे. किमान आम्ही आता तुम्हाला भेटू शकतो. बोलू शकतो. चर्चा करू शकतो. तर मग, आताच विचार करा.मनाची तयारी करा.मला कळवा. मी येतो. सोबत माझा फोन नंबर देतो. ९२७०९६३१२२ तुम्हाला शक्य असेल तर जळगावला या. जर शक्य नसेल तर मी नाशिकला येतो.
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव, मो.९२७९९६३१२२














