Home महाराष्ट्र धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !…

धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !…

329

▪️आदर्श महामाता व “सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका ” महिलांना भेट !…

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगांव(दि.29जानेवारी):- शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वेणू प्रमोद पाटील यांनी महिलांचा हळदी – कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी जगातील सर्वोत्तम मातृत्व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, भारतातल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख, त्यागमूर्ती माता रमाई या महानायिकांचा पी डी पाटील सर लिखित “आदर्श महामाता ” ग्रंथ सर्व कॉलनीतील महिलांना “वान ” म्हणुन देण्यात आला. 

          हळदी – कुंकू ला सर्व कॉलनीतील महिला एकत्रित येतात. विविध विषयांवर चर्चा होते. हे एकत्रित येऊन महिलांसाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले. चुल आणि मूल संकल्पना मोडीत काढुन महिलांना गुलामगिरीतून खऱ्या अर्थाने मुक्त केलं अशा प्रेरणादायी महामातांचा ग्रंथ प्रत्येक महिलेला भेट देऊन या महामातांचा विचार घरा-घरात पोहोचवावा या उद्देशाने हे ग्रंथ व सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका भेट स्वरूपात वेणु पाटील यांनी दिली. 

           याप्रसंगी सर्वांना अल्पोहार देण्यात आला. याप्रसंगी शोभा चौधरी, किरण विसपुते, सुमन सैनी, ममता पवार, अश्विनी पवार, उज्वला कोळी, मीराबाई महाजन, पल्लवी कुलट , माधुरी कुलट , भारती पाटील, मीराबाई न्हावी , प्रतिभा सुतार, दिपाली न्हावी, योगिता मिस्तरी, प्रियंका गुरव यासह कॉलनीतील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व महिलांनी वैचारिक ग्रंथ भेट आनंदाने स्वीकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here