Home Breaking News वीहीरगांव येथे वाघाने गुराख्याला केले ठार-कक्ष ८५८ वनपरीक्षेञातील घटना 

वीहीरगांव येथे वाघाने गुराख्याला केले ठार-कक्ष ८५८ वनपरीक्षेञातील घटना 

2122

✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604

चिमूर(दि.25जानेवारी):-तालुक्यातील वीहीरगांव येथील दयाराम लक्ष्मण गोंडाणे (वय – ६० वर्ष) हे १० वाजता गुराख्यासोबत गायी राखण्यासाठी गेले होते. ११ वाजताच्या दरम्यान कक्ष ८५८ वनपरीक्षेञात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.

   सवीस्तर वृत्त असे आहे की , वीहीरगांव येथे आडीपाडीने गुरे राखण्याची प्रथा आहे. चार -पाच गुराखी १० वाजता ८५८ या वनपरीक्षेञात गुरे राखण्यासाठी गेले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने दयाराराम लक्ष्मण गोंडाणे वय -६० वर्ष या गुराख्यावर हल्ला करून जागीच ठार केले.

    ही माहीती जाणीक धाडसे शेळ्या राखणाऱ्या व्यक्तीने वीहीरगांव येथे फोन करून माहीती दीली. ही माहीती सुध्दा वनवीभागाला देण्यात आली. गावकरी व वनवीभागाचे कर्मचारी हे ८५८ या वनपरीक्षेञात जाऊन घटनेचा पंचनामा केला. शववीच्छेदनासाठी चिमूर उपजील्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.

    घटनेचा पंचनामा वेळी वनवीभागाचे कर्मचारी 

कक्ष क्र. ८५८ राखीव वन सौ. योगिता आत्राम (वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगाव),अमोल कवासे (क्षेत्र सहाय्यक मदनापुर), किनाके,निखुरे वनपाल, वनरक्षक श्री. नागलोत, मेश्राम, जिवतोडे, जरारे, गेडाम, दुधे, खारडे आणि इतर कर्मचारी आणि पी.आर‌.टी. चमू रोपवन मजुर आणि बिट मदतनीस हे उपस्थीत होते.

        दयाराम लक्ष्मण गोंडाणे मृत यांच्या कुटुंबींयाना तात्काळ वनवीभागानी ५० हजाराची मदत केली. मृताच्या मागे 2 मुले १ मुलगी व पत्नी आहे. या घटनेमुळे गुराखी दहशतीत असुन परिवारात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here