Home चंद्रपूर चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.तर्फे रक्तदान शिबीर- २८ दात्यांनी केले रक्तदान 

चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.तर्फे रक्तदान शिबीर- २८ दात्यांनी केले रक्तदान 

169

✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604

चिमूर(दि.25जानेवारी):-ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांचा जन्मदिन दि.24 जानेवारीला केमिस्ट मंडळी दरवर्षी साजरा करत असतात.

           या वर्षी आप्पासाहेबांच्या 75 व्या जन्मदिना प्रित्यर्थ संपूर्ण भारतात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो. च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

          या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन गुरुदेव भक्त आदरणिय प्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये एकूण 42 मंडळींनी प्रत्यक्ष शिबिर स्थळी येऊन नोंद केली, त्यात 28 मंडळी रक्तदान करण्यास पात्र ठरले. या 28 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.

   हे रक्तदान शिबिर दुर्गा माता मंदिर,(वडाळा पैकु)चिमूर येथे घेण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर यांच्या सौजन्याने हे शिबिर घेण्यात आले.

             चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट यांच्या मार्गदर्शनात चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.ने हा उपक्रम राबविला. चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.चे तालुका अध्यक्ष अजय चौधरी तसेच तालुका सचिव स्नेहदिप खोब्रागडे यांच्या पुढाकारातून ह्या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

   या शिबिराप्रसंगी गुरुकूंज कॉलनीतील दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कराळे, ट्रस्ट चे सचिव चंद्रशेखर नन्नावरे, उल्हास पवार, प्रशांत तडस तसेच चिमूर तालुक्यातील केमिस्ट मंडळींनी आपले सामाजिक भान जपत या शिबीर प्रसंगी मोलाचे सहकार्य केले .

        प्रत्येक रक्तदात्याना डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

  चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.कडून नाश्ता,चहा,बिस्कीट , एनर्जी ड्रिंक तसेच केळी चे वाटप रक्तदात्याना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here