Home महाराष्ट्र सहा महिन्यापासून जन्म/मृत्यू आदेश मिळत नसल्याने नागरिका मध्ये संताप

सहा महिन्यापासून जन्म/मृत्यू आदेश मिळत नसल्याने नागरिका मध्ये संताप

163

▪️गंगाखेड तहसील मध्ये तीन कर्मचारी बदलूनही जन्म/मृत्यू नोंदणी आदेश वेळेवर मिळेना

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31डिसेंबर):-सर्व सामान्य नागरिकांना कोर्टाकडून जन्म/मृत्यू आदेश प्रमाणपत्र दिले जात होते, परंतु न्यायालय प्रक्रियेमध्ये जास्तीचा वेळ लागत असल्यामुळे शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढण्यात आला कि सर्व सामान्यांना लवकर जन्म/मृत्यू नोंदणी आदेश मिळावे या उद्देशाने शासन निर्णय काढूनही गंगाखेड तहसील कार्यालयामध्ये सहा महिन्यापासून जन्म/मृत्यू आदेश मिळत नसल्याचे नागरिकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. जन्म,मृत्य नोंदणीसाठीअशिक्षित,अज्ञान यांना तर परेशान होत आहेत. त तरीही कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकाची दया-माया येईना.

काही नागरिकांनी तर जन्म मृत्यू आदेशावर आमरण उपोषणाची निवेदन देणार असल्याचे माजी नगरसेवक अमानुल्लाखा काकांनी तोंडी सांगण्यात आले.मा.तहसीलदार यांनी संबंधित कर्मचारी यांना डिपार्टमेंटचा कारभार सांभाळता येईना म्हणून सलग तीन कर्मचारी बदलूनही जन्म,मृत्यू आदेश मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस परेशान असल्याचे दिसून येत आहे. जन्म मृत्यू आदेश करिता तहसील कार्यालया मध्ये अर्ज प्रस्ताव गठ्ठेच्या/गठ्ठे विभागामध्ये पडून आहेत संबंधित विभागातील नवीन आलेल्या गायकवाड मॅडम प्रत्येक नागरिकांना कोर्टा प्रमाणे तारखा फक्त देतात व पुन्हा थोड्या वेळाने सांगतात माझ्याकडील कॉम्पुटर बंद आहे मी तुम्हाला वेळेवर जन्म,मृत्यू आदेश देऊ शकत नाही.

असंही शेवटी सांगण्यात येत आहे बाहेर गावाहून येणाऱ्या मॅडम महिला/ पुरुष अर्जदारांना वेळेवर जन्म मृत्यू आदेश देऊन सहकार्य करतील का..? या विभागातील कर्मचारी बदल करून ही वेळेवर आदेश मिळेल का..? या सर्व अडचणीवर वरिष्ठ अधिकारी तोडगा काढतील का..? राजकीय पुढारी/पत्रकार सर्वसामान्या प्रश्नाकडे डोकावून पाहतील का..? जवळपास गंगाखेड तहसील कार्यालय मध्ये हजारो अर्ज असताना या अर्जावर कार्यवाही का होत नाही..? असे कितीतरी प्रश्न सर्व सामान्यांना पडल्या शिवाय राहणार नाहीत. बाहेर गावाहून अपडाऊन करणारे कर्मचारी पाच दिवसाचा आठवडा असूनही शुक्रवारी पूर्ण दिवटी करतील का..? असेही चर्चिल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here