Home महाराष्ट्र मतदारसंघातील लोकांच्या प्रेम, स्नेहाचे ऋण फेडणे अशक्य – आ.डॉ.गुट्टे

मतदारसंघातील लोकांच्या प्रेम, स्नेहाचे ऋण फेडणे अशक्य – आ.डॉ.गुट्टे

100

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31डिसेंबर):-यंदाची निवडणूक फार निर्णायक होती. त्यामध्ये आपले गाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळे या विजयात आपलाही वाटा आहे. तसे बघितले तर हा केवळ माझ्या एकट्याचा नव्हे, तर मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे. मी केवळ निमित्तमात्र आहे. तरीही गावोगावी स्थानिक लोक मोठ्या आपुलकीने सत्कार करीत आहेत. यापूर्वीचे कामांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देत आहेत. त्यामुळे दररोज आपण भावनिक होत असून मतदारसंघातील लोकांच्या प्रेम, स्नेहाचे ऋण फेडणे अशक्य आहे, असे भावुक प्रतिपादन स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

तालुक्यातील मौजे.इसाद येथील छत्रपती शिवाजी चौकात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आ.डॉ.गुट्टे यांचा रासप, मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, आ.डॉ.गुट्टे यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून आ.डॉ.गुट्टे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांना मल्हार ग्रुपच्या वतीने काठी आणि घोंगडी देवून सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आपल्या मतदारसंघाच्या चौफेर विकासाची भूमिका घेवून पुढे जायचे आहे. तुमच्या सर्वांच्या सोबतीने विकासाचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे निवडणूक काळातले प्रसंग व घटना सोडून द्या. आपापसातील मतभेद दूर करा. शेवटी आपल्या भागाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे मधल्या काळात जे झालं ते विसरून मतदारसंघातील गावोगावी सर्वांनी एकत्र यायला हवे. कारण, सर्वांच्या साथीने विकासाला नवी दिशा व चालना मिळत असते. म्हणून झालं गेलं विसरून कामाला लागा. तसेच आपापल्या गावच्या व परिसराच्या समस्या, अडचणी व प्रश्न माझ्या निर्देशनास आणून द्या. तसे झाले तर आपल्या मतदारसंघात प्रश्न, समस्या, अडचणी शिल्लक राहाणार नाहीत. त्यामुळे सर्वांना एकजूट व्हा आणि आपल्या गावाचा व परिसराचा विकास करता येईल, याकडे विशेष लक्ष द्या. कारण, गाखेड हा माझ्यासाठी केवळ विधानसभा मतदारसंघ नसून माझा परिवार आहे.

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात माझा उत्तम संपर्क आहे. प्रत्येकाला मी भेटत असतो. त्यांचे प्रश्न व अडचणी दूर करीत असतो. त्यातून मलाच समाधान मिळते. सर्वसामान्य लोकांची व्यक्तीगत कामांसह सार्वजनिक कामेही मार्गी लावल्यामुळे त्यांना माझ्या विषयी आदर आणि आपुलकी आहे. तशी आपुलकी आपल्या गावानेही वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्यामुळे हेच प्रेम, माया, आपुलकी आणि विश्वास कायम असू द्या. कारण, हे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते जपण्याचा मी सुध्दा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच येत्या काळात आपल्या मतदारसंघात सुविधांची समृद्धी निर्माण करण्यासाठी कटिबध्द आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दिलेली सर्व आश्वासने आणि शब्द पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम सुध्दा करणार आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशनराव भोसले यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर सातपुते यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भगवान (दादा) सातपुते, सभापती साहेबराव भोसले, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किसनराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, भुजंगराव दादा सातपुते, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, प्रभारी हनुमंत मुंडे, राजेभाऊ बापू सातपुते, पंचायत समिती सदस्य नितीन बडे, भुजंगराव सातपुते, प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते, प्रा.मारुती साळवे, रखमाजी पाटील, अंकुशराव भोसले, शिवाजीराव पवार, आप्पासाहेब भोसले, अंगद बडे, बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब भोसले, कुलदीप जाधव, पोलीस पाटील अशोकराव भोसले, उद्धवराव चोरघडे, बाळासाहेब भोसले, माजी पोलीस निरीक्षक अच्युतराव भोसले, सतीश पाटील, सर्जेराव सातपुते, भास्कर ठवरे सुदर्शन भोसले अंगदराव बडे यांच्यासह जय मल्हार ग्रुप व महारुद्र क्रीडा मंडळ, राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य तसेच महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here