Home महाराष्ट्र 2018 पासून शेख परिवार स्वस्त धान्य पासून धन्यपासून वंचित-तहसीलदार यांचेकडे केली तक्रार

2018 पासून शेख परिवार स्वस्त धान्य पासून धन्यपासून वंचित-तहसीलदार यांचेकडे केली तक्रार

127

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27डिसेंबर):-तालुक्यातील महातपूरी येथील रहिवासी शेख रोशन इमामसाब, शेख अमर रोशन, शेख समीर रोशन या शेख परिवाराने महातपुरी गावातील स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नसल्याची गंगाखेड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

महातपुरी येथील शेख परिवाराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावातील रास्त भाव दुकानदार स्वस्तिक केरबा मुलगीर यांच्या दुकानाशी शिधापत्रिका जोडलेली होती 2018 पर्यंत व्यवस्थित धान्य मिळत होते परंतु 2018 नंतर तिघांचे स्वस्त धान्य दुकानदाराने कोणत्या आधारे आमचे धान्य बंद केले आहे हे मात्र कळू शकले नाही 2018 पासून आमच्या परिवाराला स्वस्त धान्य मिळत नसल्याचे म्हटले आहे स्वस्त धान्य दुकानदार मुलगीर यांच्याकडे धान्यासाठी प्रत्येक महिन्याला जाऊन धान्याची मागणी केली असता धान्य दुकानदार 2018 पासून जवळपास दहा वेळेस आमचे आधार कार्ड व दोनशे रुपये प्रमाणे अनेक वेळा घेतलें परंतु आतापर्यंत आम्हा परिवारास धान्य मिळाले नाही आम्ही धान्य दुकानदारांना याबाबत विचारपूस केली परंतु वेळोवेळी अडचणी सांगून परत शिधापत्रिका, आधार कार्ड घेऊन परत दोनशे रुपये प्रमाणे पैसे मागितले अनेक वेळा पैसे देऊन देखील आमच्या कुटुंबीयांना आतापर्यंत धान्य मिळाले नाही याची तात्काळ चौकशी होणे अत्यंत गरजेचे असून आमच्या परिवारास शेती नसताना ही शेतकरी योजनेमध्ये आमच्या परिवाराचे नाव आकस बुद्धीने मुद्दामहून टाकण्यात आले आहे.

पंधरा-वीस एकर शेती असलेल्या शेतकरी नागरिकांना धान्य मिळते पण भूमिहीन गोरगरीब दारिद्र्यरेषेखाली नागरिकांना धान्य मिळत नाही 2018 ते 2024 पर्यंत मुलगीर यांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार काळाबाजार होत असून प्रमाणापेक्षा वाजवी दराने धान्य विक्री होत असून सदरील गैरव्यवहाराची खातेनिहाय चौकशी करावी व नियमाप्रमाणे आमच्या शिधापत्रिकेवर धान्य सुरू करावे अन्यथा कुटुंबासह आमरन ऊपोषणास बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर शिधापत्रिका धारक शेख रोशन इमामसाब, शेख अमर रोशन, शेख समीर रोशन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here