Home महाराष्ट्र वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी स्वतः नदीत उतरून केली...

वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी स्वतः नदीत उतरून केली कार्यवाही

632

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27डिसेंबर):-गंगाखेड तालुक्यातील झोला परिसरातील गोदावरी नदी काठावरील वाळू चोरण्यासाठी वापरण्यात येणारे एक तर्फा,मसला येथील एक तरफा वाळू चोरण्यासाठीचे एकूण दोन तर्फे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या आदेशान्वये तहसीलदार उषाकिरण शृंगारे गंगाखेड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश न देता स्वतः महिला असूनही स्वतः धाडस दाखवत धारखेड नदी पात्रात उतरून झोला गावाकडे पाण्यातून चालत येऊन नदी पात्राच्या कडेला असलेले दोन तराफे झोला आणि मसला येथील असल्यामुळे संपूर्ण तराफे नष्ट करत कारवाई केली.

मसला,झोला परिसरा मध्ये नदीमधील वाळू चोरण्याच्या उद्देशाने रात्रंदिवस तराफ्याच्या साह्याने वाळू उपसा करत गाढवा, ऑटो द्वारे वाळू शहरांमध्ये अवैधरित्या नेत असतात. प्रत्येक दिवशी होत असलेली वाळू चोरी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याच्या उद्देशाने वाळू चोरणाऱ्यांचे साहित्य काही दिवसांपूर्वीच तहसीलमध्ये जमा केले असता ही पुन्हा वाळू तस्करांनी पुन्हा एकदा चोरीसाठी लागणारे साहित्य त्या ठिकाणी आणत चोरी करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळेच धाडसी पाऊल उचलण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कार्यवाहीला सुरुवात केली.

त्यामुळे वाळू चोरांना जरब बसला असून या कार्यवाही करण्याच्या पथकामध्ये प्रामुख्याने गंगाखेड नायब तशिलदार अशोक केंद्रे, गंगाखेड मंडळ अधिकारी शंकर राठोड, महसूल कर्मचारी गणेश सोडगीर, सुदीप चोरघडे,शिवाजी शिंगणवाड, ए. पी. आय. व्यवहारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी साळवे, पोलीस पाटील गोविंद मॅड, महसूल सेवक नर्सिंग चाटे, महसूल सेवक संजय जाधव, महसूल सेवक संतोष भारसाखरे, शिपाई सुरेश भालेराव, इत्यादींनी कार्यवाहीत मदत करत धाडस दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here