


▪️रविवारी अपघातात झाला होता चिमुकल्याचा मृत्यू : साकोली जि. प. शाळा व्यवस्थापनची सांत्वना भेट
✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.10डिसेंबर):-शहरातील जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. ०१ गणेश वार्ड येथील ४ थीचा विद्यार्थी वेदांत चौधरी याचा रविवारी ता. ०८ ला अपघातात दूर्देवी मृत्यू झाला. गरीब चौधरी कुटुंबियांची सांत्वना भेट घेऊन शाळा वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
वेदांत राकेश चौधरी १० वर्ष हा जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. रविवार ता. ०८ डिसेंबरला स. ०९:४५ ला राज्य महामार्ग लाखांदूर रोडवरील रोडला शोल्डरच नाही अश्या धोकादायक वळणावर त्याच्या सायकलला ट्रॅक्टरची धडक लागून गंभीर जखमी झाला होता. त्यास उच्च उपचारासाठी नागपूरला नेत असता वाटेतच मृत्यू झाला. गोवारी समाजातील अत्यंत आर्थिक परिस्थितीने कमकुवत चौधरी कुटुंबातील हुशार व गुणी मुलाच्या अपघाती निधनाने अख्खे परीसर हळहळले व अंत्यसंस्काराला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकाकुल जनसागर लोटला होता. ( मंगळ. १० डिसें.ला ) जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. ०१ येथील शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीने चौधरी कुटुंबात सांत्वना भेट घेऊन वेदांतच्या आईकडे शाळा वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच शाळा प्रशासन वतीने लवकरच वेदांत च्या अपघाती विमा बाबद प्रकरण दाखल करीत “हुरहुन्नरी व गुणी” वेदांत च्या कुटूंबियांसोबत नेहमी शाळा व समिती पाठीशी उभे आहे असे शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. वलथरे यांनी वेदांतचे वडील राकेश चौधरी, आई व कुटुंबियांशी चर्चा व सांत्वना भेट दरम्यान सांगितले. सांत्वना भेट प्रसंगी शिक्षकवृंद चेतन बोरकर, एम. व्ही. बोकडे, श्रद्धा औटी, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, शालिनी राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, सदस्य आशिष चेडगे, भागवत लांजेवार, पूनम मेश्राम, वैशाली कापगते व चौधरी कुटुंबिय उपस्थित होते.















