Home चंद्रपूर जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दि.16,17 व 18 ऑगस्ट रोजी...

जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दि.16,17 व 18 ऑगस्ट रोजी शुभ आगमन

580

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- जगात सर्वात नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे, झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे. अश्याच गुरु आणि शिष्याच्या प्रेमळ नात्याचा अनुभव घेण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज म्हणजेच आपले लाडके बाप्पा यांचा पुण्यतिथी वारी उत्सव प्रथमच उपपीठ पूर्व विदर्भ, मोहगाव झिल्पी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे लाभलेला आहे. आपण सर्व सहकुटुंब, सहपरिवार व इष्ट मित्रांसह निमंत्रित आहात. त्याचप्रमाणे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या प्रत्यक्ष व मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 17 व 18 ऑगस्ट ला सकाळी नऊ वाजता ज.न.म.संस्थान उपपीठ पूर्व विदर्भ मोहगाव झिल्पी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्यावेळी आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो व तिचा आधार घेत असतो. अंधश्रद्धेमुळे आपले दुःख कमी होत नाही तर उलट अधिकच वाढत जाते. यातून बाहेर पडून आपले जीवन सुखमय होण्यासाठी परमपूज्य स्वामीजी आपल्या समस्या ऐकून घेतात व त्यावर योग्य मार्गदर्शन करीत असतात. आपणास कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या असल्यास आपण थेट परमपूज्य स्वामीजींशी भेटून त्याचे निराकरण करून घेऊ शकता. परमपूज्य स्वामीजी आपल्या मनातील अंधश्रद्धा दूर करून अध्यात्म व वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात निर्माण करतात. स्वामीजींचे मार्गदर्शन पूर्णतः विनामूल्य असते, याकरिता परमपूज्य स्वामीजी स्वतःच आपल्या भेटीसाठी आपल्या उद्धारासाठी येतात तरी आपण दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजता उपपीठ पूर्व विदर्भ मोहगाव झिल्पि, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे येऊन मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच 17 ऑगष्ट ला उपासक दिक्षा व 18 ऑगष्ट ला साधक दिक्षा देण्यात येणार आहे. आपण सर्व आवर्जून यावे असे आवाहन ज.न.म.संस्थान उपपीठ पूर्व विदर्भपीठ प्रमुख श्री. राजेंद्रकुमार भोयर, व्यवस्थापक श्री.प्रविण परब , चंद्रपूर जिल्हा निरीक्षक राजेश येरने,जिल्हाध्यक्ष लडी सर व जिल्हा कमिटी भक्त सेवा मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here