Home चंद्रपूर धर्मादाय रुग्णालयाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

धर्मादाय रुग्णालयाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

245

उपक्षम रामटेके, सह संपादक मो. 98909 40507
*चंद्रपूर, दि. 7 :* जिल्हास्तरीय धर्मादाय रुग्णालय समीतीची सभा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त पी के. करवंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. किरण देशपांडे, सागर खडसे, मंजुषा भगत, दिपमाला गायकवाड, रुपेंद्रकुमार उपासे उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी धर्मादाय रुग्णालय योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले व योजनेस पात्र असलेल्या रुग्णांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सदर सभेत पी. के. करवंदे यांनी धर्मादाय रुग्णालय योजना, योजनेतील लाभार्थी यांचे निकष, रुग्ण खाट उपलब्धता, वैद्यकीय सेवा याबद्दल तसेच चंद्रपूर जिल्हयातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here