


रोशन मदनकर, उपसंपादक,मो. 8888628986
भंडारा:-
मांडवी, करडी मुख्य रस्त्यावरील खमारी व डोंगरदेव येथे रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्या कारणाने पुराचे व पावसाचे पाणी पुलावर येतो व रस्ता पुर्णपणे बंद होते. या रस्त्यावरून करडी, पालोरा, मुंढरी, कान्हाळगाव, बोरगाव, खडकी, डोंगरदेव, ढिवरवाडा, मांडवी, बेलगाव, मंडनगाव खमारी येथिल विद्यार्थी व कामगार शिक्षणासाठी व रोजगारासाठी भंडारा शहराला यावे लागते, त्यामुळे शिक्षणात व रोजगारात मोठ्या प्रमाणात अडथळा तयार होते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
करडी ते भंडारा मार्गावरील मांडवी पासुन ते खडकी पर्यंत मुख्य रस्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असुन त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वी सुद्धा खड्डयामुळे अपघाताने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यामुळे त्वरीत कामांना मंजुरी देवुन काम सुरु करावे.
स्वाभिमानी शेतकरी संघटने
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना मागणी केली.













