Home चंद्रपूर आ. बंटी भांगडिया यांनी दिली मोटेगाव येथील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

आ. बंटी भांगडिया यांनी दिली मोटेगाव येथील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

470

 

चिमुर -तालुक्यातील मौजा – मोटेगाव* येथील रहिवाशी वंदना अरुण दडमल हिचे मेंदूला मार लागल्यामुळे, सिद्धार्थ मोतीराम गेडाम यांचे हाताचे हाड मोडले, राजू दडमल यांचे हात फॅक्चर झाल्याने औषधोपचार करीता आर्थिक मदत दिले.
तिन्ही आपद्ग्रस्तांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने उपचाराचा खर्च कसा करायचा हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला. कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांना उपचार करिता आर्थिक मदतीची मागणी केली असता आ.भांगडिया यांनी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांच्या मार्गदर्शनात आर्थीक मदत घरपोच पाठवून दिली.
आर्थीक मदत सुपूर्द करतांना बु. अ. प्रदीप सुकारे, महामंत्री विलास कोराम, श.के.प्र. विक्की कोरेकर, बु. अ. गणेश मेहरकुरे, भाजपा कार्यकर्ता रमेश कंचर्लावार, अडसोडे, पर्वते बंधू, योगेश सहारे उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here