


सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३० चिमूर-विधानसभा मतदार संघांचे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथील निवासस्थानी शहरातील नेहरू वार्ड, गुरुदेव वार्ड व ठक्कर वार्ड येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतला.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला चिमूर शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून चिमूर शहरातील युवा कार्यकर्ते अतुल खुळसंगे, मारोती उईके, गणेश दिघोरे, चेतन बघेल, संकेत बघेल, महेश नैताम, कुणाल बघेल, मयूर मानकर, तुषार इजमुलवार, हिमांशू मोहिनकर, निलेश मोहिनकर, नानु पचारे, महेंद्र मडावी, रोशन कामडी, विक्रम इजमुलवार, आशिष बघेल, शुभम जुमडे व अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.
यावेळी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते रमेशजी कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा नेते अजहर शेख, चिमूर कृ. उ. बा. समिती संचालक दिनकरराव सिनगारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकर, भाजयुमो तालूका महामंत्री रोशन बन्सोड, भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन बघेल, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, भाजयुमो शहर महामंत्री निखिल भुते, भाजपा युवा नेते तथा बूथ अध्यक्ष गुणवंत चटपकार, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालूका महामंत्री पराग अंबादे, भाजपा युवा नेते नरेंद्र हजारे, भाजपा बूथ अध्यक्ष राकेश भोयर व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.














