Home महाराष्ट्र जळगावी होणार राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलन

जळगावी होणार राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलन

330

जळगाव :- जळगाव शहरातील विविध चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बैठक २८ ऑगस्ट रोजी पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली . महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे हे अध्यक्षस्थानी होते . त्यांनी बैठकी मागील उद्येश स्पष्ट करताना सांगितले की , आपण जळगाव येथे दोन दिवसीय संविधान साहित्य संमेलन आयोजित करून संविधान विषयी जनजागृती करावी . सदर संमेलन राज्यस्तरीय स्वरूपाचे ठेवावे , संविधानावर लिखाण करणारे साहित्तिक , विचारवंत यांना निमंत्रित करावे , संविधनावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार द्यावे असे विचार मांडले .
प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की , संविधान साहित्य संमेलन हे राज्यस्तरीय असावे , यात संविधान रॅली , संविधान विषयक नाटिका वा नाट्य असावे , याच बरोबर संविधान सभेतील कमकाजा विषयी झालेली चर्चा , काही ऐतिहासिक दस्तावेज असलेली स्मरणिका काढावी , राज्याबाहेरील संविधानावर संशोधनात्मक काम करणाऱ्या निवडक लोकांना बोलावून त्यांच्या मुलाखती घ्याव्या अश्या सूचना केल्या . आपल्या देशात संविधान येक शो पीस होवू पाहत आहे , जे संविधानाची शपथ घेतात तेच संविधान विरोधी काम करण्यात अग्रेसर दिसतात तेंव्हा अश्या उपक्रमातून संविधान विषयक जनजागृती होण्यास मदतच होईल असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
प्रसिध्द साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी संविधान साहित्य संमेलनातील विविध विषयांची मांडणी केली . निमंत्रित वक्ते कोण कोण असावेत त्यांची नावे सांगितली , संमेलन सर्वसमावेशक करण्या करिता करावयाच्या उपाययोजना सांगितल्या , संमेलनात राज्यभरातून किमान शंभर प्रतिनिधी निमंत्रित करून किमान पंधराशे श्रोते जमतील या संदर्भाने मेहनत घेण्यात यावी असे सांगितले .
बैठकीचे सूत्रसंचालन कवी बापूराव पानपाटील, प्रास्ताविक प्रतिभा शिरसाठ तर आभारप्रदर्शन भाऊराव इंगळे यांनी केले . बैठकीत विजयकुमार मौर्य , दिलीप सपकाळे , गोपाळ पाचवणे , महेंद्र केदारे , चंदन बिऱ्हाडे, रमेश बहारे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस जिल्ह्यातील विविध पंधरा संघटनांचे प्रतिनिधी हजर होते . या संधर्भाने तालुका निहाय बैठकांचे आयोजन , जिल्हास्तरीय कार्यकारिणी तयार करणे , विविध मान्यवरांचे लेख मागविणे या संबंधीचे सर्व अधिकार आयोजक मुकुंद सपकाळे यांना सर्वानुमते देण्यात आले . ४ ऑगस्ट रोजी पुढील बैठक घेण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here