Home चंद्रपूर मोहाळी गावातील घरात घुसुन बिबट्याने केले सहा जणांना जखमी

मोहाळी गावातील घरात घुसुन बिबट्याने केले सहा जणांना जखमी

310

 

(प्रशांत गेडाम, प्रतिनिधी )
सिंदेवाही – तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र बफरझोन मधील आज दिनांक 19/07/2024 शुक्रवार ला सकाळी अंदाजे 7.30 वाजता उपवन परिक्षेत्र नलेश्वर मोहाळी गावातील घरात घुसून बिबट्याने सकाळी गावातील घरातील सहा इसमावर हल्ला करून जखमी केले. मोहाळी येथिल जख्मी मध्ये एकुण 6 व्यक्ती मध्ये 1)विजय देवगीरकर वय अंदाजे 35 वर्षे 2) मनोहर दांडेकर वय अंदाजे 50 वर्षे 3) जितेंद्र दांडेकर वय अंदाजे 30 वर्षे 4) सुभाष दांडेकर वय अंदाजे 25 वर्षे 5) ऋतिक वाघमारे वय अंदाजे 18 वर्षे 6) पांडुरंग नन्नावरे वय अंदाजे 32 वर्षे असून
जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाळी येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरता हलवण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी संबंधित वन विभागाला वेठीस धरून वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची नागरिकात रोष आहे. घटनास्थळी सध्या चंद्रपूरातून रेस्क्यू टीम गावी पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here