


*सचिन सरतापे (प्रतिनिधी. म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : कोरेगाव तालुक्याने रिपब्लिकन चळवळीला अनेक कार्यकर्ते दिले पॅंथरच्या काळामध्ये कोरेगाव तालुक्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी काम करत होती. गटातटाच्या फोडाफोडीच्या राजकारणात सर्वसामान्य भीमसैनिकांचा चळवळीतील राजकीय पक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यामुळे चळवळीची गती कमी झाली आणि त्याचा फटका हा सामान्य जनतेला आज बसत आहे. भरकट चाललेल्या रिपब्लिकन चळवळीला योग्य दिशा देत आता घराघरात पोहोचवायच आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे कुणा एका जातीसाठी काम करणारी चळवळ नाही तर शेतकरी कष्टकरी दीन दुबळ्यांच्या प्रश्नासाठी काम करणारी सर्वसमावेशक चळवळ म्हणजे रिपब्लिकन चळवळ. आजच्या जगातील ज्वलंत असणारे या सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे यासाठी लागणारा लढा उभारण्याचे काम खऱ्या अर्थाने कोरेगाव तालुक्यातून सुरू करण्याचा निर्णय आज तालुक्यातील ३० गावातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी घेतला.
सामान्य जनतेचे सर्व मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असा निर्धार आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला. सामान्य जनतेचे रेशनकार्ड, लाईट बिल, आवास योजना, विविध शासकीय योजना, कृषी विषयक अडचणी अशा अनेक प्रश्नांना येणाऱ्या काळामध्ये वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज कोरेगाव तालुक्यामध्ये उभारणार व जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम इथून पुढच्या काळामध्ये करणार.
आजच्या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष स्वप्निल भाई गायकवाड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री सुरेश येवले तालुका अध्यक्ष दादासो माने, तालुका सरचिटणीस स्वप्निल वाघमारे व विविध समित्यांचे पदाधिकारी यांनी केले व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.














