


✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. 1जुलै)
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे माजी अध्यक्ष, या विभागाचे माजी आमदार, लोकनेते, शिक्षण महर्षी श्रद्धेय कै. ॲड. अनंतराव देवसरकर यांना जयंतीनिमित्त येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
उमरखेडसह यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार – प्रसार झालाच पाहिजे, अशा निर्धाराने यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्था जिल्ह्यात रुजवण्याचे श्रेय कै. ॲड. अनंतराव देवसरकर यांना जाते. शिक्षणाची गंगा बहुजनांसह सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत नेली. दिलेल्या शब्दाला जागणारे लोकनेते अशी त्यांची जनमानसात ओळख होती. सहकार, राजकारण, विधी यासह अनेक क्षेत्रांत त्यांचे अतुलनीय योगदान होते.
प्रा. अभय जोशी यांनी प्रार्थना सादर केली. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. दत्तराव शिंदे, अमृतराव पाटील, साहेबराव कांबळे, नारायणदास भट्टड, जेठमल बंग, चितांगराव कदम, किशोर भवरे, अजीज भाई, जगदेवराव पाटील देवसरकर, दिलीप नरवाडे, सुभाष शिंदे, प्रेमराव वानखेडे, डॉ. अरूण बंग, वनमालाताई राठोड, किसन वानखेडे, शिवाजी माने, सुधाकर वानखेडे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, कृष्णा देशमुख, प्रकाश वानखेडे, शिवाजी देशमुख, अविनाश खंदारे, डॉ. ब्रिजू थंकाचन, डॉ. बेट्सी थंकाचन, संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी नरवाडे, सचिव डॉ. या. मा. राऊत व इतर पदाधिकारी यांच्यासह शिक्षण, विधी, सहकार, राजकारण, पत्रकारिता, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लॅब व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कै. ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर व मॉडर्न पब्लिक स्कूलच्या अध्यक्ष रेणुश्री देवसरकर यांनी कै. ॲड. अनंतरावजी देवसरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेद्वारा संचालित सर्व विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, सर्व कर्मचारी उपस्थित होते.














