Home महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजनेचा लाभ योग्य लाभार्थांना देण्यासाठी काम करणार-पिराजी कांबळे

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ योग्य लाभार्थांना देण्यासाठी काम करणार-पिराजी कांबळे

264

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड ;- समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व वयोवृद्ध नागरिकांसाठी असलेली शासनाची संजय गांधी निराधार योजनेचा लाभ योग्य ,गरजु व पात्र लाभार्थ्यांना करुन देण्यासाठी काम करणार असल्याचे मत गंगाखेड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य पिराजी कांबळे यांनी व्यक्त केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तालुका संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना, श्रावण बाळ, दिव्यांग लाभ योजना , राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना यांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी कार्य करण्यात येणार आहे.
तालुक्यातील मौजे हरंगुळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख यांनी समितीचे सदस्य पिराजी कांबळे यांना संपर्क साधत गावातील अनुसया बाबुराव सुर्यवंशी या अर्धांगवायू ( पॅरालेसिस ) आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेस योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे असे सांगितले त्यावेळी सदस्य पिराजी कांबळे यांनी तत्काळ स्वतः या योजनेचे फॉर्म घेउन हरंगुळ येथे सुभाष देशमुख व दामोदर जोंधळे यांना सोबत घेऊन महिलेच्या घरी भेट देऊन पहाणी केली असता त्या महिलेच्या घराची परिस्थिती अतिशय हालाखीची नाजुक दिसुन आली. त्यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध पती बाबुराव सुर्यवंशी हे राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे दु:खद निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच त्यांची मुलगी रेणुका लक्ष्मण पैठणे हिच्या पतिचेही निधन झाले आहे. आपल्या पतिच्या निधनानंतर मुलगी रेणुका हीच आपल्या वयोवृद्ध आई वडीलांची सेवा करत आहे. तीही आपल्या मुलांसह माहेरी राहाते.
हरंगुळ येथील सुर्यवंशी कुटुंबाची हालाखीची परिस्थिती,आजारपण यामध्ये मुलगी आपल्या आई वडिलांना जगविण्यासाठी संघर्ष करत आहे. ही परिस्थिती पाहुण डोळे पाणावल्या शिवाय राहात नाहीत.
वयोवृद्ध आजारी अनुसया बाबुराव सुर्यवंशी , बाबुराव मोकींद सुर्यवंशी व त्यांची विधवा मुलगी रेणुका लक्ष्मण पैठणे या तीघांनाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांचे अर्ज सदस्य पिराजी कांबळे यांनी थेट घरी जाऊन भरले. यावेळी त्यांच्यासोबत दामोदर जोंधळे, गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख, शेख अकबर , गोविंद पैठणे आदी उपस्थित होते.
– —– संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ तालुक्यातील गरजू व योग्य लाभार्थ्यांना व्हावा यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन सदस्य पिराजी कांबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here