Home यवतमाळ मांडवा येथे खरीप पुर्व हंगाम नियोजनाबाबत मार्गदर्शन

मांडवा येथे खरीप पुर्व हंगाम नियोजनाबाबत मार्गदर्शन

125

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद – तालुक्यातील मांडवा येथे खरीप हंगाम ग्रामस्तरीय खरीप पूर्व नियोजना बाबत आढावा सभा ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद आशिष बीजवाल यांनी मातीच्या सुपिकतेचे महत्व व पाण्याचे महत्व समजून सांगितले तसेच दुग्ध व्यवसायाबाबत माहिती दिली.
तसेच पुसद तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी कपाशी पिकाकरिता योग्य वाणाची निवड ,ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, महाडीबीटी पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी ए. बी. राठोड यांनी खताचा योग्य वापर, बीजप्रक्रिया, योग्य वाणाची निवड करण्याबाबत मार्गदर्शन केले.
मंडळ अधिकारी तहसील समाधान धुळधुळे यांनी बांबू पिकाच्या लागवडीबाबत माहिती.आणि कृषी सहाय्यक एस. पी .जाधव यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व बियाणाची उगवण क्षमता प्रात्यक्षिक दाखविणे.

उपस्थित मान्यवरांनी मांडवा शांतिधामास भेट देऊन तिथे कार्य करणाऱ्यांचे कौतुक करुन पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले.

यावेळी सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, सर्व ग्रा.पं.सदस्य,रोजगारसेवक बाळु धाड तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ तथा शेतकरी बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी एस.टी. तडसे यांनी केले .तर आभार तलाठी जया खैरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here