Home यवतमाळ जागतिक महिला दिनी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक संपन्न

जागतिक महिला दिनी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक संपन्न

246

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद : जागतिक महिला दिनी वंचित बहुजन आघाडी जिल्हा आढावा बैठक पुसद येथील विश्रामगृहामध्ये आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाऊराव गायकवाड, विजय लहाने, गणेश पाईकराव, उत्तमराव ढोले, प्रमोद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमता माता सावित्री, माता रमाई यांना अभिवादन करून स्त्रीमुक्ती दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडी तालुका पुसद व वंचित बहुजन आघाडी शहर च्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख महिला आघाडीच्या विद्याताई नरवाडे,सुनंदा धबाले, संघमित्रा कांबळे, कल्पना सावळे, दुधडेताई, तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, मधुकर सोनवणे, यशवंत कोल्हे, संदीप आढाव ,भास्कर बनसोड ,समाधान बळी, आकाश पठाडे, अमोल जोगदंडे ,प्रशांत कांबळे, संतोष जोगदंडे, सतीश खाडे ,प्रल्हाद नवसागरे तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here