Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

145

 

नांदेड : हदगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगाव तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व शिवजयंती निमित्त सर्वाना खिचडी वाटप करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागोराव गंगासागर प्रा. राजेश राऊत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामिडवार, हदगाव तालुका अध्यक्ष शिवाजी जोजार, उपाध्यक्ष अरविंद भोरे, कैलास तलवारे, अभिजित देवसरकर, खांडेकर यांच्यासह अनेक पत्रकार बांधव व हदगाव शहरातील प्रतिष्ठित मान्यवर अपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगाव तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्यामुळे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here