Home महाराष्ट्र अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल खंडाळा येथे मा. बाळकृष्ण देसाई यांच्या हस्ते 75...

अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल खंडाळा येथे मा. बाळकृष्ण देसाई यांच्या हस्ते 75 वा प्रजासत्ताक दिन झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न

315

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड – मा. बाळकृष्ण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल खंडाळा शहर या ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजीचा 75 वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या संस्थापक सचिव माननीय दिपालीताई देशमुख यांच्या निमंत्रणावरून आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (प) बाळकृष्ण देसाई सर, जिल्हा प्रवक्ता मा सिद्धार्थ खरात, वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा युवक आघाडीचे नेते मा अमित वाघमारे, यांच्यासह सैन्यातील सेवानिवृत्त माननीय जगताप व खैरे, तसेच अनेक मान्यवर त्यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून भाषण करताना देसाई सरांनी, ” भारतीय संविधान हे सर्व भारतीयांचे जीवन जगण्याची भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ची एक आचारसंहिता झाली आहे. यामुळे आपण देशाची एकात्मता, अखंडता, सार्वभौमत्व, टिकवून आहोत. पहिली ते पाचवी चे विद्यार्थी भारत देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्यावरती होणारे संस्कार, देशाचे भविष्य भक्कम करणारे आहे.”
यावेळी देसाई सरांसह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध सांघिक स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आले. संस्थेच्या सचिव मा दिपालीताई देशमुख यांनी त्यांच्या भाषणात, ” संस्था प्रगतीचा आलेख निर्माण करताना, विद्यार्थ्यांच्या सहभागाने करत आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्था माफक फी घेऊन शिक्षणाचा प्रचार व प्रसार करत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेतील शिक्षकांनी केले. तसेच कार्यक्रमातील उपस्थित सर्वांचे आभार शाळेतील शिक्षकांनीच केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here