


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 19 डिसेंबर) तालुक्यातील चिंचोली (संगम) येथील भोई समाजातील नागरिकांना 50 ते 60 वर्षापासून चिंचोली (संगम) ग्रामपंचायत च्या क्षेत्रात वास्तव्य असून शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या घरकुल योजनेच्या सर्व निकषांमध्ये असून तीन ते चार पिढ्या सुद्धा शासनाच्या घरकुला संबंधी असलेली विविध योजनेची कुठल्याही योजनेतून अध्यापही भोई समाजातील एकाही लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचे रिपब्लिकन युवा सेना यांच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना निवेदन देण्यात आले आहे.
लाभार्थी हे मागासवर्गीय घटकात येत असून त्यांची आर्थिक परिस्थिती काय हालाकीची असल्याने संबंधितांचे घरे ही पाचरट व कुडाची असून जीर्ण अवस्थेत झालेली दिसून येत आहे.
चिंचोली (संगम) हे गाव भौगोलिक दृष्ट्या पूरपरिस्थितीत संदर्भात अतिसंवेदनशील आहे.
कच्ची असलेली घरे क्षतीग्रस्त होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता असून या भोई समाजाच्या नागरिकांना तात्काळ घरकुल मंजूर करून नयाय देण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.
चौकट;- चिंचोली (संगम) येथील भोई समाजाच्या नागरिकांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून देण्याचा प्रयत्न करीन…! – प्रविणकुमार वानखेडे (गट विकास अधिकारी)
यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, गौतम नवसागरे तालुका अध्यक्ष, शुद्धोधन दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड, साहेबराव कदम, भीमराव खंदारे, कैलास खडसे, भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, पत्रकार दिलीप मुनेश्वर, विजय कदम, प्रवेश कवडे,मारुती आगिरे परसराम आगिरे, संजय आगिरे, संतोष आगिरे, जमना गोडारे, गजानन गोडारे इत्यादी अनेक भोई समाजाचे नागरिक उपस्थित होते.














