


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड:- (दि.12 डिसेंबर)
बिरसा क्रांती दल या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निलेश अन्नपूर्णा लक्ष्मण पिलवंड यांची निवड करण्यात आली आहे.
आदिवासीं समाजाच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे निर्भिड पत्रकार निलेश पिलवंड यांच्या कार्याची दखल घेऊन बिरसा क्रांती दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी मडावी,राज्य अध्यक्ष रंगराव काळे, राज्य उपाध्यक्ष डी बी अंबुरे यांनी घेतली आहे. निलेश पिलवंड यांची यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. निलेश पिलवंड यांच्या निवडीमुळे उमरखेड तालुक्यातील आदिवासीं समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निलेश पिलवंड यांनी आपल्या निवडीचे श्रेय बिरसा क्रांती दल राज्य प्रशिक्षक माजी सैनिक नारायण पिलवंड,खरेदी विक्री संघ संचालक माधवराव पिलवंड,हनुमंतराव पिलवंड,आदिवासीं कृती समिती उमरखेड चे अध्यक्ष उत्तमराव पांडे व सर्व उमरखेड तालुक्यातील आदिवासीं समाज बांधव यांना दिले आहे.














