Home चंद्रपूर पती-पत्नीचे प्रेम, अज्ञानाने संघर्ष आणी ताटातूट!

पती-पत्नीचे प्रेम, अज्ञानाने संघर्ष आणी ताटातूट!

122

 

 

अलीकडे पती पत्नी चे प्रेम असतांना, कोणीतरी शुल्लक बाब सांगून त्या पती पत्नीच्या प्रेमात आडकाठी आनण्याचा प्रयत्न केला जातो. ही बाब पती च्या किंवा पत्नीच्या लक्षात येत नाही आणी त्यातून थोडी, किंचित कटुता निर्माण होते. आणी आपसात संघर्ष सुरु होतो. मग आरोप, प्रत्यारोप सुरु होतात.तु अशी, तु तशी, तु तसा, तु असा, तु तु मे मे ला सुरवात होते. पुढे मतभेद निर्माण होतात.त्या लहानश्या ठिणगीतून वणवा पेट घेतो.पुढे आत्महत्या साठी प्रऊत्त केले जाते किंवा तिचा त्याचा खून केला जातो.ही बाब खूप मोठी होते.पुढे दोन्ही कुटुंबाला त्रास होतो. हा त्रास एवढा मोठा असतो की जीवनभर मनावर घर करून राहतो. हे पती पत्नीला अगोदर कळू नये हेच अज्ञान आहे.मग या त्याच्या डिग्रीचा फायदा काय? शिक्षणाचा फायदा काय? मुलींना मुलाकडील गुलाम समजतात,तिला वेटबिगार प्रमाणे तिच्या कडून काम करवून घेतात. मुलाचे आई,वडील,भाऊ ,नणंद सर्व तिला टोचून बोलतात. नोचून खातात,तिला आत्महत्येसाठी बाध्य करतात.किंवा तिची तिच्या वडिलांची हत्त्या केली जाते.पद्धतशीर पणे कट रचून मुलीच्या वडिलाला मारून टाकल्या जाते.तसे ते नियोजन करतात. तोच मुलगा,मुलाचे आई ,वडील त्याच्या मुलीसाठी मागणी करतात,तिच्या सुरक्षेची हमी देतात. आणी त्यानी दिलेली हमी पूर्ण करीत नाही.बल्की तिच्या कडून सर्व कामे करवून घेतात.तीने नकार दिला तर तिला उद्धट म्हटले जाते.तिचे आई वडील यांना,शिव्या दिल्या जातात अपमानित करतात.असे वारंवार झाले की मुलीचा स्वाभिमान जागा होतो. मग ती संघर्ष करायला लागते.कारण अलीकडील मुलगी ही शिक्षित आहे. तिचे आई वडील समान वागणूक देतात,तिला मुला प्रमाणे समान अधिकार देतात.त्यामुळे तिला शिक्षणामुळे अधिकार आणी कर्तव्य याची जाणीव होते.पुढे तिच्यात स्वावलबन निर्माण होते.शिक्षणामुळे ती स्वाभिमानी बनते. आणी पतीच्या चुकीच्या निर्णया विरोधात बोलायला लागते.पतीला वाटते माझा अपमान करते.मुलाच्या बाजूला आई वडील,त्याचे भाऊ,बहीण हे सारे एक होतात आणी तिला एकटी पाडतात. तिला टार्चर करतात. पुढे आई वडिलाला शिवीगाळ होते.ती एकटी काय करणार? आई वडिलांचा सहारा घेते.वडील,आई मुलींचे मागील,पुढील योग्य,अयोग्य पाहून जे योग्य त्याच्या मनाला वाटते ते निर्णय घेतात.
मुलीची सुरक्षा कशी करावी कोणता निर्णय घ्यावा हे समजणें आई,वडिलाला कठीण जाते. आई वडील चिंतेत पडतात.काय करावे काही समजत नाही. हार्ड चा रुग्ण असेल तर तो त्याच्या बोलण्याने अट्याक येऊन असाच मरून जातो. मुलीचा घरचा कर्ता वडील मरण पावल्याने तिच्या घरच कुटुंबं निराधार बनते.इकडे मुलाला,मुलाच्या आई,वडील भाऊ,बहिणीला आनंद होतो.कालांतराने त्याच्या ही बहिणीला असाच त्रास होतो तेव्हा तो मात्र दुसऱ्याला दोष देता. माझी बहीण खूप चांगली आहे.असे चित्र समाजा समोर मांडण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा लोक त्या मुलावर हसतात पण ती वेळ गेलेली असते. मग तो म्हणतो माझ्या बहिणीवर अन्याय झाला आहे.पण त्याच्या त्याच बहिणींनी शुल्लक कारणावरून घरात आग लावली. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या वडील अट्याक नी मरण पावला हे तो विसरतो.अस म्हणतात,इथेच सारे काही भरावे लागते.निसर्ग कोणालाही सोडत नाही.तो श्रीमंत असो अथवा गरीब,शिकलेला असो अथवा अडाणी, नोकरीवर असो अथवा व्यवसाय करणारा सर्वाला समान न्यायाची वागणूक देतो. तिथे निर्सर्गात समान न्याय असतो.ही बाब अज्ञाना पोटी तो शिकलेला विसरतो. कारण त्याला भान नसते, समाजिक जाण नसते.केवळ असतो त्याकडे मी पणा,स्वार्थ,अहंकार,पैशाचा माज, द्वेष,करुणाचा अभाव,यामुळे भांडणे होतात.हे वास्तव आहे.
पती,पत्नीची भांडणे हे केवळ अज्ञानामुळे होते. मुलीनेच मुलाच्या घरी का जावे? कायद्यापुढे सर्व समान आहे तर मग मुलगा हा मुलीच्या वडिलाला,आईला आपले आईवडील समजून मदत का करीत नाही. केवळ त्याच्या कडून कसे जास्त मिळेल ही अपेक्षा त्याची असते. हुंडा, लग्नात सामान, लग्नाचा खर्च मुलींच्या वडिलानेच करावा, मुलगी वडिलाकडे शिक्षण घेतल्याने तिला नोकरी लागली तर तिच्या वडिलांचा,आईचा फायदा होत नाही बल्की पतीला न काही करता फुकटचा पगार मिळतो म्हणजे न कामाचा फुकटचा पगार तरी देखील मुलीचा पती मुलीच्या आई वडिलाला दुय्यम वागणूक देतो. अस का घडते? शिक्षणाचा अभाव? या समाजिक जाणीवेचा अभाव? नेमके काय म्हणावे? समजावे ?हे समजणें कठीण आहे.आवश्यक गरज काय आहे. समाजिक दृष्टीकोन कसा आहे, कोटुंबुक हेतू कसा आहे. कुटुंब म्हणजे काय?केवळ पती कडील कुटुंब म्हणजे कुटुंबं का?मुलीच्या आई वडिलाला दिल्या जाणारी दुय्यम वागणूक हिच भांडणाला खरी कारणीभूत असते. घरी येणाऱ्या मुलीला,नोकरांनी समजणें,स्वतःच्या मुलीसारखी वागणूक न देणे.इथूनच खरी भांडणाची सुरवात होते.हे केव्हा मुलाला,त्याच्या आई वडिलाला समजेल सांगता येत नाही. काही मुलीचा पण दोष असतो यात दुमत नाही पण आई,वडील मात्र कधीही आपल्या मुलीच्या संसारात दखल देत नाही. काही अपवाद असू शकतात.पण जेव्हा मुलीवर जास्त अन्याय होत आहे असे दिसते त्यावेळी मात्र मुलीच्या वडिलाला,आईला तिची काळजी घ्यावी लागते.तिच्यावर झालेल्या अन्यायाला दूर सारण्यासाठी हस्त क्षेप करावा लागतो.नाहीतर मुलीची जीवित हानी झाल्याशिवाय राहात नाही. शेवटी त्याच अपत्य असते ती आपल्या मुलीवर लहानपणापासून प्रेम करतात तिला वाऱ्यावर कसे सोडणार? म्हणून तिची देत घेऊन तक्रार करतात त्यामुळे आज 90% मुलीच्या केसेस आपल्याला कोर्टात अलीकडे पाहावंयास मिळतात, याला दोष कुणाला देणार? त्यामुळे वास्तव समजून घेण्यासाठी सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे. ते खरे म्हणजे मुला,मुलीला, तिच्या आई वडिलांना,,बहीण,भावाला, असे असेल तर भांडणे होणार नाही. म्हणजे पती,पत्नीचे प्रेम,अज्ञानाने संघर्ष,आणी ताटातूट होणार नाही.

अविनाश टिपले,चंद्रपूर
7875909804.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here