Home यवतमाळ ग्रामपंचायत बेलखेड येथे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळणे बाबत न मिळाल्यास...

ग्रामपंचायत बेलखेड येथे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळणे बाबत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार

156

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी यवतमाळ)
मो.9823995466

उमरखेड (दि. 31 ऑक्टोंबर) ग्रामपंचायत बेलखेच्या वतीने मराठा समाज ओबीसी प्रवर्गात मधून आरक्षण मिळेपरेंत येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कर तसेच बेलखेड गावचे सर्व पक्षांनुमते, राजकीय पुढार्‍यांना गावबांधी आहे.

बेलखेड येथील सर्व ग्रामस्थांनी उमरखेड येथे साखळी उपोषण असलेल्या मंडपाला भेट देऊन आपला सहभाग नोंदवला आहे.

या मंडपाला भेट देत असताना तालुक्याचे माजी आमदार माननीय प्रकाश पाटील देवसरकर,बेलखेड ग्रामपंचायतचे सरपंच तथा उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता.

यामध्ये वसंतरावजी डोळस,संतोष माधवराव शिंदे,संतोष संभाजी वरुडे मारोतराव किशन कदम किशोर सुभाष धुमाळे, शुभम शेषराव ठाकरे, या कार्यक्रमास महिलांनी आवर्जून हजेरी दिली होती.महिलांमध्ये पुष्पाबाई सुनील शिंदे, उमा शंकर शिंदे, अनुसयाबाई विजय, मंदाबाई सुरेश डोळस, अन्नपूर्णा अर्जुन डोळस, रेखा पांडुरंग डोळस, दिपाली संतोष डोळस, राजश्री संतोष डोळस, एकनिष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटील चंद्रवंशी आंबोळीकर,दादाराव पाटील वानखेडे खरूसकर, संजय दिगंबर पर्जना, दिलीप प्रकाश राणे दगडी, संतोष बाबाराव सुरोशे नागसवाडी व व सकल मराठा बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here