


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.29 ऑक्टोंबर)
जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा,उमरखेड मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली.
माहेश्वरी चौक मधून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवांना अभिवादन करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पोहोचला.
या ठिकाणी विविध मागणयांचे निवेदन देवुन आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या.
धिक्कार मोर्चा कॄती समिती उमरखेड यांचे वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य मोर्चात सहभागी सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच महसूल विभाग, ग्रामसेवक संघटना, बेरोजगार, पेनशनर्स व शेतकरी, तसेच, महाविद्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक वृंद, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, व उर्वरित सर्व विभागातील कर्मचारी बंधु आणि भगिनीं यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
आपल्या उमरखेड तालुक्यातील सर्व संघटना समन्वय समिती च्या बहाद्दर शिलेदारांनी जी एकजुटीची मशाल हाती घेतलीय आणि आशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे हा मोर्चा खरं तर ऐतिहासिक असा झाला.
तिथे मोर्चाचे स्वरूप सभेमध्ये झाले. सर्वांच्या सहकार्याने आजचा धिक्कार मोर्चा ऐतिहासिक आणि यशस्वी केला.
सर्व संघटना समन्वय समिती च्या बहाद्दर शिलेदाराच्या आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आजचा हा धिक्कार मोर्चा यशस्वी झाला.
——-
हमारी युनियन हमारी ताकद हम सब एक है,
संघर्ष हमारा नारा है,
सदैव संघर्षासाठी तत्पर
पेटलेल्या संघर्ष रूपी मशालीला
अशीच धगधगती ठेवुया – श्री. विजय मुंगे(संयोजक सुकानू समिती,धिक्कार मोर्चा कॄती समिती,उमरखेड)














