


बळवंत मनवर/पुसद
पुसद 12 ऑक्टोंबर रोजी खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंभारी येथील मृतक लक्ष्मण पवार यांच्या प्रकरणातील आरोपी बापूराव अप्पाराव होडगीर देवराव आप्पाराव होडगीर लक्ष्मण अप्पाराव होडगीर यांना अटक करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. मृतक यांचा मूलगा पुंडलिक लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या लेखि तक्रारीनुसार मृतक लक्ष्मण पवार यांचा मुलगा कुंडलिक लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या लेखी तक्रार मध्ये सदर आरोपी यांनी संगणमत लक्ष्मण पवार यांचा खून करून अंगावर विजाचे (खांब) पोल लोटून दिले त्यामुळे वडील लक्ष्मण पवार हे मरण पावले. सदर आरोपींवर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा . आरोपींना लेखी तक्रार देण्यात आलेली आहे तरीसुद्धा आज चार दिवस होऊन गेले तरी आज तयागत सदर आरोपींना अटक करण्यात आले नसून पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे . समाजामध्ये वाढता आक्रोश पाहून दोन दिवसाच्या आत तात्काळ आरोपींना अटक करून 302 नुसार गुन्हे दाखल करून मृतकास न्याय देण्यात यावा . अन्यथा गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतिने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . येणाऱ्या दिवसात होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासनावर राहील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी करिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .














