Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !… डॉ.भालेराव...

महात्मा फुले हायस्कूल येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !… डॉ.भालेराव यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना २४ स्पोर्ट जर्सी किट व व्हॉलीबॉल भेट !…

125

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगाव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल चे माजी विद्यार्थी डॉ. लुनेश्वर भालेराव ( पत्रकार तथा उद्योजक – पुणे – धरणगाव ) यांनी महात्मा फुले हायस्कूलच्या व्हॉलीबॉल व कबड्डी संघासाठी ‘ १२ – १२ स्पोर्ट जर्सी व व्हॉलीबॉल शाळेस देणगी स्वरुपात उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा आज हृदय सत्कार करण्यात आला .
प्रथमतः क्रिडा शिक्षक श्री एच डी माळी यांनी डॉ. लुनेश्वर भालेराव यांचा परिचय करून दिला . त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक श्री एम बी मोरे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन डॉ. लुनेश्वर भालेराव यांचा सत्कार करण्यात आला .
या नंतर शाळेचे उपशिक्षक श्री व्ही.टी. माळी यांनी डॉ. लुनेश्वर भालेराव यांच्या कार्यबद्दल माहिती दिली . व शाळेस यापुढेही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
सत्काराला उत्तर देताना डॉ. लुनेश्वर भालेराव यांनी गुरुजनांबद्दल आदरभाव व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आपल्या कार्यात गुरुजनांचे ज्ञान व मार्गदर्शन खूप मोलाचे ठरते . आपणही शाळेविषयी कृतज्ञता बाळगावी सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रिडाशिक्षक एच डी माळी यांनी केले . कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here