Home महाराष्ट्र संविधान सन्मानार्थ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची साताऱ्यात जाहीर सभा

संविधान सन्मानार्थ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची साताऱ्यात जाहीर सभा

236

सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : दलित, मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा, अल्पसंख्यांक यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात शाहू नगरी भिमाई भूमी सातारा येथे ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता गांधी मैदान, सातारा येथे भव्य जाहीर सभा आयोजित केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात असे जाहीर केले आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात होऊन गेला मात्र या देशातील शोषित पिढीत,वंचितांच्या जगण्याला आज ही न्याय मिळत नाही उलट दिवसेंदिवस अन्याय,अत्याचाराने संस्कृती दहशतवादाने सर्वसामान्य बहुजनांची जगणं मुश्किल होऊन जात आहे.मराठा आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला आबाल वृद्धांवर जीव घेणा हल्ला, मराठा तरुणांना जातीपातीत अडकावून भडकावून इतरांवर जीव घेणा हल्ला करायला लावून जेलमध्ये अडकवून जीवन उध्वस्त करायचे षड्यंत्र चालवले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या नांदेडच्या युवकाला ठार केले, साताऱ्यातील पानवाण येथे मातग महिलेला भर चौकात निर्दयपणे मारहाण करण्यात आली, पुसे सावळीत जातीय दंगल घडवून निष्पाप मुस्लिम युवक नुरुल हसनला जीवे मारले गेले येथील धर्मस्थळावर हल्ला चढवून समाजमन क्लूषित केले, वर्धनगड बनवडी येथील मुस्लिम निष्पापांना घरात घुसून जीवे मारण्याचे उद्देशाने हल्ला केला थोडक्यात धर्म आणि जातीच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद माजवून मराठा,दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, ओबीसीच्यावर जुलुम सुरू केलाय त्यामुळे या देशात संविधान स्वातंत्र्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय इथली मनुवादी व्यवस्था सत्तेच्याचाव्या हाती घेऊन पावलोपावली संविधानाची पायमल्ली करताना दिसत आहे
संविधानात धर्मनिरपेक्षता आहे मात्र धर्मसापेक्ष कारभार राबवला जातोय संविधानात समाजवाद सांगितलाय परंतु प्रत्यक्षात भांडवलशाहीचा विळखा घट्ट होताना दिसतोय संविधानात समता आहे मात्र व्यवहारात विषमता आहे हा अंतर विरोध संपवण्यासाठी या देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या विचार व्याखयेतील समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे नव्हे तर ते आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे ओबीसींचे सामाजिक राजकीय आरक्षण धोक्यात आणले आहे गरीब मराठा, शेतकरी, श्रमिक, कष्टकरी जनतेला कोणी वाली राहीला नाही अशावेळी आपण सर्वांनी सतर्क राहून संविधानातील न्याय, हक्क अधिकारासाठी शोषित पिढीत वंचितांच्या संरक्षणासाठी संविधाना बचावा साठी एक व्हायला हवे.
नेणकी हीच हाक बुलंद करण्यासाठी आणि देशातील वंचितांच्या मनगटात दहा ह त्तीचे बळ निर्माण करण्यासाठी माननीय ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या देशभर सभा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून साताऱ्यात 7 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा “हर जोर जुर्मकी टक्कर मे संघर्ष हमारा नारा है” या उद्घोषणा अधिक मजबूत करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्व वंचित बहुजन लोकांनी या सभेला हजर राहण्याचे आवाहन वंचित चे जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here