Home महाराष्ट्र जातीय द्वेष की सत्तेचा उन्माद खासदार हेमंत पाटलांचे संसद सदस्यत्व रद्द करा.....

जातीय द्वेष की सत्तेचा उन्माद खासदार हेमंत पाटलांचे संसद सदस्यत्व रद्द करा.. एनडीएमजे ची राष्ट्रपती, अनुसूचित जमाती आयोग व लोकसभा अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

138

बळवंत मनवर/पुसद
___________________________
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड चे अधिष्ठाता डॉ. शामराव रामजी वाकोडे हे कर्तव्य पार पाडत असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील हे दि.तिन आक्टोंबर रोजी त्यांच्या साथीदारांसह व कार्यकर्ते यांना घेऊन डा.वाकोडे यांच्या कॅबीन मध्ये जाऊन त्यांनी अश्लील भाषा वापरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता उच्च पदावर कार्यरत असलेल्या डॉ.वाकोडे यांना सार्वजनिक सौचालय व मुतारी स्वतः च्या हाताने साफसफाई करण्यास भाग पाडले आहे. डॉ.वाकोडे हे अनुसूचित जमाती मधील आंध या जातीचे असल्याने मुद्दामच जातीयवादी द्वेष भावनेतून व सत्तेच्या उन्मादातुन सामाजिक सलोखा बिघडावा व जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वक कृती केली आहे.
भविष्यात डॉ.वाकोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या खासदार हेमंत पाटील व यांच्या साथीदारांसह कार्यकर्ते कडून जिवितास धोका निर्माण झाला आहे. डॉ.वाकोडेनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल केलेला एफ.आय.आर. पोलिस अधिकारी तपासात ब फाईनल करून रद्द देखील करुन डॉ.वाकोडे यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवून जिवन उध्वस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.या साठी नेशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस एनडीएमजे या संघटनेच्या वतीने भारताचे राष्ट्रपती, केंद्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली व अध्यक्ष लोकसभा भारत सरकार यांना जिल्हा अधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून निवेदन देऊन पोलिस तपास पारदर्शक करून खासदार हेमंत पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करुन प्रचलित सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर एनडीएमजे चे राज्य सहसचिव पी.एस.खंदारे, विदर्भ विभागीय अध्यक्ष डॉ.एम.बी.डाखोरे, विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजु दारोकार, जिल्हा सचिव निलेश भोजणे, जिल्हा सल्लागार नारायण मिटकरी,वामन विर,शेख अन्सार,समिर भगत, काशिराम बोके, बाबाराव गोदमले, जगदेव झाटे, गजानन ढोके, संजय लोखंडे
आदिच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here