Home महाराष्ट्र आरोग्य स्वयंसेविका समाजासाठी करीत असलेल्या सहाय्याप्रती शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व...

आरोग्य स्वयंसेविका समाजासाठी करीत असलेल्या सहाय्याप्रती शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना अंतर्गत कृतज्ञता समारोहाचे आयोजन

250

✒️मुंबई प्रतिनीधी(महेश कदम)

मुंबई(दि.29ऑगस्ट):-शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना शाखा क्र . २०१ अंतर्गत युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत वडाळा विधानसभेतील आर. ए. किडवाई रोड, किडवाई नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाना येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेकरीता आयोजीत करण्यात आलेला ‘बॅग व छत्रीचे वाटप’ हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

मुंबई शहरातील तळागाळापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत आरोग्याच्या मूलभूत सुविधा पोहचविण्याचे काम हे आरोग्य स्वयंसेविका करीत असतात. कोरोना काळात केवळ या आरोग्य स्वयंसेविकांमुळे संक्रमणावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते.

या कार्यक्रम प्रसंगी विभाग संघटिका, माजी महापौर सौ. श्रद्धाताई जाधव, विभाग संघटक श्री. राकेश देशमुख, माधुरीताई मांजरेकर, रवी घोले, विशाल जाधव, भाऊ करगुटकर, मोहम्मद हुसैन, दिपक पाटील, स्वप्नाली ठाकूर, स्मिता वाडेकर, सुनिता बळी, प्रमिला गुरखे, श्रध्दा तांबे, सुरेखा साळवी त्यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here