


✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.29ऑगस्ट):-अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपुर तालुक्यातील हारेगाव येथे शुभम मधाडे या बौध्द समाजाच्या तरूणास गावगुंडानी कबुतर चोरीचा खोटा आरोप करुन अमानुष मारहाण करुन थुंकी चाटायला लावली व झाडाला बांधुन अंगावर लघवी केली.या जातीयवादी लोकांनी जातीय भावनेने तरुणाच्या तोंडावर लघवी करून त्याच्यावर अमानवी अत्याचार करण्यात आला आहे.तरी सदरील घटनेचा निषेध करुन, आरोपी यांना कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गंगाखेड येथील समाज बांधवांच्या वतीने मा.तहसिलदार साहेब,गंगाखेड यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब,यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.संजय पारवे,सुभाष शिंदे,राहुल गायकवाड, कैलास झुंजारे,गौतम रोहीणकर, सिध्दोधन सावंत, बाळासाहेब पांचागे,संघमित्र गायकवाड, लिंबाजी व्हावळे, बाळासाहेब जंगले,बाळु साळवे,खुशाल परतवाघ,विकास रोडे, संतोष हनवते, शशिकांत गवळे,आमोल कांबळे, चंद्रशेखर साळवे, बाबुराव गायकवाड, अनिल मस्के, निवृत्ती केदारे,शिवराज पैठणे, प्रमोद सरवदे,राजेश वाघमारे,अनंत उजगरे, नरेंद्र भालेराव, देविदास पारवे, प्रकाश हातागळे,बाबुराव खंदारे आदी उपस्थित होते.













