Home महाराष्ट्र पाचोरा येथे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा-बीड जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी

पाचोरा येथे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा-बीड जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी

165

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

जळगाव(दि.11ऑगस्ट):- जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी बीड जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले.

पत्रकार संदीप महाजन हे दि.१० ऑगस्ट रोजी आपल्या दुचाकीवरुन जात असताना काही हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पत्रकारावरील हा हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ल्ला असून ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. यापूर्वीही राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याचा घटना घडल्या आहेत. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नाही. यामुळे असे हल्ले वाढत असून राज्यात पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने या हल्ल्याचा जाहिर निषेध करण्यात येत असून हल्लेखोरांना पत्रकार संरक्षयण काद्यान्ववये कडक शासन करावे, जेणे करुन पुन्हा पत्रकारांवर असे हल्ले होणार नाहीत, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी बीड यांना करण्यात आली. यावेळी बालाजी मारगुडे, अनिल जाधव, जालिंदर धांडे, उदय नागरगोजे, मुकेश झणझणे, केशव कदम, प्रभात बुडूक, ज्ञानोबा वायबसे, अमोल मुळे, डॉ.गणेश ढवळे, केशव कदम, आनंद डोंगरे, युनुस शेख, बाळासाहेब मस्के आदींसह पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here