Home महाराष्ट्र मांडवा येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मांडवा येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

169

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1ऑगस्ट):-तालुक्यातील मांडवा येथे लोकशाहिर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०३वी जयंती यंदा जयंतीला डिजे न लावता व इतर खर्च टाळुन अण्णाभाऊ साठे चौकाच्या सुशोभीकरणासाठी तरुण मंडळीनी पुढाकार घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा,वसंतराव नाईक या महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, डॉ. संदिप चव्हाण,सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, ग्रा.पं.सदस्य संगिता गजभार,ग्राम परिवर्तन समितीचे अध्यक्ष बजरंग पुलाते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ध्वजारोहण इंडियन आर्मी पंजाब राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दिलीप आडे, सम्राट गजभार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.

यावेळी चौकाच्या सुशोभीकरणासाठी सिमेंट ३०बँगा,गिटी १ट्रक्टर,गज १किंटल ३०किलो,ही वस्तू रुपी मदत आली तर त्रेसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये आर्थिक मदत आली असुन चौकासाठी एकुण खर्च १लाख ४०हजार रुपये लागत आहेत.तरीही आपापल्या परीने सहकार्य करावे असे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लखन दाढे यांनी केले व सुत्रसंचालन पांडुरंग रणखांब यांनी केले. तर आभार देविदास गजभार यांनी मानले.यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती मंडळ व समाज बाधंव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here