Home महाराष्ट्र अंतरगावात प्रेरणादायी सत्कार कार्यक्रम

अंतरगावात प्रेरणादायी सत्कार कार्यक्रम

275

✒️सिंदेवाही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सिंदवाही(दि.29जुलै):- तालुक्यातील अंतरगाव मुक्कामी ग्रामपंचायत कार्यालयात एक प्रेरणादायी व गौरवशाली सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.माजी पं. स. सदस्य तथा या गावचे माजी सरपंच श्री हरिदास रामचंद्र चापले यांच्या अध्यक्षतेखाली, उद्घाटक प्राचार्य जयंतराव येलमुले गडचिरोली, प्रा. मिलिंद सुपले ब्रह्मपुरी, प्रा. प्यारमवार सावली, ग्रामगीताचार्य श्री विलास बोरकर, ग्रामगीताचार्य डॉ. राम गभने, श्री रुपेश बत्तुलवार, व श्री विश्वनाथ कामडी यांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे अनावरण व माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने रीतसर उद्घाटन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्री आत्माराम मारोतराव आंबोरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविक द्वारे प्रगट केला.”निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती कराने, सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने..” वंदनीय महाराजांनी राष्ट्रवंदनेत लिहिलेल्या या उक्ती प्रमाणे गावातील चार जवान देश सेवेसाठी तत्परतेने सेवेत असल्याची नोंद वंदनीय महाराजांचा आशीर्वादच ठरला असावा अशाच सदविवेक विचाराने श्री आत्माराम आंबोरकर यांनी दिनांक 14 जुलै 2023 रोजी आपल्या मूळ गावी ग्रामपंचायत कार्यालयात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार समारंभाचे आयोजन केले.

वीर जवानांच्या मातोश्री श्रीमती रुमावती आंबुरकर सौ जया कांबळी सौ सुलभा कांबळी श्रीमती वेणूताई ढाले यांना साड्या व ग्रामगीता इतर साहित्य देऊन तर सोबतच प्रणय आंबोरकर, सचिन कांबळी या वीर जवानांचा आणि गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच, सदस्यगण, पोलीस पाटील या सर्व मंडळीचा पाहुण्यांद्वारे यथोचित सत्कार झाला.याप्रसंगी सर्व पाहुणे मंडळीची प्रेरणादायी भाषणे झालीत.

ग्रामगीताचार्य प्रेमदास मेंडुलकर यांच्या स्वरचित ‘ माहेरचे ग्राम गीत ‘ मधून या गावाची महती आणि वैभव लक्षात आले. वंदनीय राष्ट्रसंतांची या गावावर कृपा असून भविष्यातही उदो उदो हो अशी प्रतिक्रिया उद्घाटक प्राचार्य जयंतराव येलमुले, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद सुपले व ग्रामगीताचार्य विलास बोरकर यांनी व्यक्त केली. प्राध्यापक मिलिंद सुपले यांनी वंदनीय राष्ट्रसंतांची ‘ग्रंथसंपदा’ या सत्कार कार्यी पुरवली.शेवटी अध्यक्षिय मनोगत होऊन उपस्थितांचे आभार पोलीस पाटील सचिन शेंडे यांनी मानले. संचालन प्रेमदास मेंडुलकर यांनी केले. गावातील बहुसंख्य लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनाने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here