


✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भंडारा(दि. 29 जुलै):- : मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी १४०० वर्षापूर्वी दिलेल्या थोर बलिदानाला उजाळा दिला. यौमे आशूरच्या दिवशी शिया मुस्लीम समाजाच्या वतीने भंडारा शहरात मिरवणूक काढून हजरत इमाम हुसैन यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिया मुस्लिम समजाचे लोक उपस्थित होते. मोहरम हा आनंदाचा सण नसून दुःखाचा दिवस आहे. या महिन्यात इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया मुस्लिम समुदायातील लोक काळे कपडे घालून या बलिदानासाठी जुलूस काढतात आणि इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतात. इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना मोहरम बुधवारी 19 जुलै सुरू झाला .
मुस्लिमांसाठी हा महिना अतिशय खास मानला जातो, जो दु:ख म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात, मुस्लिम विशेषतः शिया मुस्लिम पैगंबर मुहम्मद यांचे नातू इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याबद्दल शोक करतात. करबलाच्या मैदानात इमाम हुसेन त्यांच्या साथीदारांसह शहीद झाले.मोहरमच्या दहाव्या दिवशी यूम-ए-साजरा केला जातो
ताजी फक्त आशुराच्या दिवशी काढल्या जातात. त्यामुळे
29 जुलै रोजी आशुरा साजरा केला .
इस्लामिक मान्यतेनुसार 61 हिजरी (680 इसवी) मध्ये प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन हे त्यांच्या 72 साथीदारांसह इराकमधील करबला येथे शहीद झाले. मुहर्रम महिन्याबाबत शिया आणि सुन्नी या दोन्ही समुदायांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. शिया समुदायातील लोक मजलिस (इमाम हुसैन यांचा शहीद) साजरा करतात आणि मिरवणूक काढतात, तर सुन्नी समुदायातील काही लोक आशुरा दिवशी उपवास ठेवतात.
मुस्लीम लोक मानतात की, हजरत इमाम हुसैन यांनी इस्लाम वाचविण्यासाठी मरण पत्करल होतं. दीन-ए-इस्लाम वाचवण्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक बलिदान दिल्याचे सांगितले जाते. यामध्ये त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलासह त्यांच्या १८ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. शेवटच्या क्षणापर्यंत इमाम हुसैन यांनी आजोबा मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांचा इस्लाम हाच खरा इस्लाम आहे. हे सांगितले पण क्रूर यजिदच्या सैन्याने इमाम हुसैन यांची कोणतीही गोष्ट न ऐकता त्यांना शहीद केले.याची आठवण म्हणून सर्वत्र मोहरम साजरा केला जातो













