Home महाराष्ट्र उच्चशिक्षित डॉ.तुषार शिंदे आणि पूजा काळेल यांचा सत्यशोधक विवाह संपन्न. फुले...

उच्चशिक्षित डॉ.तुषार शिंदे आणि पूजा काळेल यांचा सत्यशोधक विवाह संपन्न. फुले एज्युकेशन तर्फे पानवन च्या सरपंच सौ.जयश्री शिंदे यांच्या मुळे म्हस्वड परिसरात प्रथमच झाला प्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह.

210

सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा.9075686100

म्हसवड: फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जोतीराव फुले यामा महात्मा पदवी दिली त्यास नुकतेच 135 वर्ष पूर्ण झाले व सत्यशोधक समाज स्थापना दिन शतकोत्तर सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त दि.15 मे 2023 रोजी दु.5 वा. सिताराम मल्टीपर्पज हॉल ,दिवड,म्हसवड येथे पानवन च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.जयश्री समाजसेवक डॉ .नानासो शिंदे यांचा मुलगा सत्यशोधक डॉ.तुषार शिंदे , एमबीबीएस, माण, सातारा आणि सत्याशोधिका पुजा भानुदास काळेल , बी.फार्म, करेलीबाग,गुजरात या उच्चशिक्षित वधू वरांचा मोफत ४२ वा . सत्यशोधक सोहळा प्रबोधनात्मक 135 मान्यवराना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ पुष्पगुच्छ ,शाल भेट देत प् प्रबोधनात्मकपणे संपन्न झाला. संस्थेतर्फे हा पहिलाच म्हसवड परिसरातील विवाह विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक रजिस्टर नोंदणी करून या नवदाम्पत्याचा सकाळी साखरपुडा , हळदी समारंभ आणि साय. सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडला.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद ,सातारा अध्यक्ष सुभाष नरळे व माजी सभापती कृषी ,पशू, सवर्धन जि. प.सातारा चे शिवाजी शिंदे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात आले.
यावेळी माण चे लोणारी समाज अध्यक्ष गोरख शिंदे,श्री. व.सौ.वसुधा कर्णे,डॉ.बोराटे, राष्ट्वादी चे अभयसिह जगताप ,कैलास तोरणे,,डॉ.केतन केळकर, एम.डी.चंदनशिवे उपस्थित होते.
वधू वर यांचे आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र सरचिटणीस रघुनाथ ढोक , विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे यांचे हस्ते दिले यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले.तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन प्रा.सुदाम धाडगे आणि प्रा.सरिता काळेल यांनी केले.

उच्चशिक्षित नवदाम्पत्य आणि त्यांचे परिवार यांनी अंधश्रध्दा , कर्मकांड , याला तिलांजली देऊन भारतीय महिलांना प्रथम शिक्षण देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ,सत्यशोधक रघुनाथ ढोक लिखित ग्रंथ भेट देऊन विवाह पार पडल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली होती तसेच अनेक डॉक्टर परिवार , राजकीय , सामाजिक मंडळी नी भरभरून उपस्थिती दाखविल्याने या सत्यशोधक सोहळ्यात मोठे महत्व प्राप्त झाल्याने ढोक म्हणाले की आता गरीब कुटुंबात देखील महापूर्षांचे विचाराने लग्न करण्यास संकोच वाटणार नाही आणि भटजीची भीती देखील या सोहळ्याने पळून गेली असे जेष्ठ आणि तरुण पिढीने तसेच महिलांनी सांगितले त्यामुळे हा पहिलाच सोहळा यसस्वी झाल्याचे बामसेफ व इतर संघटनेचे कार्यकर्त्यांनी अभिप्राय देत मते लिखित मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here